Join us  

...अन् भडकला सिंघम; म्हणाला,‘हल्लेखोरांची घृणा वाटतेय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 6:00 PM

कित्येक नागरिक हे या विषाणूच्या जाळयात अडकत आहेत. तर कित्येक जण या कोरोना आजारामुळे मृत्यूमुखी पडत आहेत. या संकटातून बाहेर पडण्यासाठी पोलीस आणि डॉक्टर्स हे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असून स्वत:ची, स्वत:च्या कुटुंबियांची पर्वा न करता रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.

सध्या कोरोना विषाणूना जगभरात  उच्छाद मांडलाय. कित्येक नागरिक हे या विषाणूच्या जाळयात अडकत आहेत. तर कित्येक जण या कोरोना आजारामुळे मृत्यूमुखी पडत आहेत. या संकटातून बाहेर पडण्यासाठी पोलीस आणि डॉक्टर्स हे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असून स्वत:ची, स्वत:च्या कुटुंबियांची पर्वा न करता रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी झटत आहेत. पण, आपल्यासाठी एवढं झटूनही त्यांच्या कार्याचे आपल्याला महत्त्व नाही, असेच दिसून येतेय. कारण अलीकडेच काही पोलिस अधिकाऱ्यांवर नागरिकांनी हल्ला केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा अभिनेता अजय देवगणने तीव्र संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत डॉक्टरांवर होणाऱ्या  भ्याड हल्ल्याचा निषेध करत त्याने राग व्यक्त केला आहे.

 काही दिवसांपूर्वी काही नागरिकांनी एका डॉक्टरवर हल्ला केला होता. त्यामुळे अजय संतापला आहे. ‘काही सुशिक्षित लोकांनी एका माहितीच्या आधारे शेजारील डॉक्टर कुटुंबावर हल्ला केला. या माहितीमध्ये किती सत्यता होती हे देखील पडताळून पाहण्याचे कष्ट या लोकांनी घेतले नाहीत. या लोकांचा प्रचंड राग आला असून त्यांची घृणा वाटायला लागली आहे. सत्यता न जाणता असं कृत्य करणारेच खरे दोषी असतात’, असं ट्विट अजयने केलं आहे.

दरम्यान, अजयने हे ट्विट केल्यानंतर अनेकांनी याप्रकरणी संताप केला आहे. तसंच अजयच्या मताशी सहमत असल्याचंही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. सध्या करोनाची लागण झालेल्या रुग्णांसाठी डॉक्टर दिवसरात्र काम करत आहेत. मात्र तरीदेखील काही जण त्यांच्यावर हल्ला करत आहेत. विशेष म्हणजे यापुढे कोणत्याही डॉक्टर किंवा परिचारिकांवर हल्ला केला किंवा त्यांच्याशी गैरवर्तन केलं तर त्या व्यक्तीविरोधात कडक कारवाई केली जाईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे.

टॅग्स :अजय देवगणकोरोना वायरस बातम्या