Join us  

38 वर्षांपूर्वी 60 दिवस अमिताभ बच्चन यांनी दिली होती मृत्यूशी झुंज, त्यावर मात देऊन झाले बॉलिवूडचे शहंशाह

By गीतांजली | Published: December 15, 2020 6:45 PM

अमिताभ बच्चन 24 जुलै 1982 नेहमीप्रमाणे आपल्या सिनेमाचे शूटिंग करत होते.

अमिताभ बच्चन 24 जुलै 1982 नेहमीप्रमाणे आपल्या सिनेमाचे शूटिंग करत होते. 'कुली' सिनेमाचे शूट चालू होते. पुनीत इस्सर बरोबर अमिताभ यांचा फाईट सीन शूट केला जात होता. या दोघांमध्ये जबरदस्त फाटिंग झाली. हा सीन पूर्ण झाला. दिग्दर्शकही म्हणाला ठीक आहे. पण अचानक अमिताभ यांना पोटाच्या एका भागामध्ये वेदना जाणवू लागली. हळू हळू वेदना इतकी वाढली की बिग बींना रुग्णालयात दाखल करावे लागले. अपघाताच्या चौथ्या दिवशी त्यांची परिस्थिती खूपच बिघडली. त्यांना खूप ताप येत होता आणि त्यांना सतत उलट्या होत होत्या. त्यांचे हृद्याचे ठोके देखील प्रचंड वाढले होते.

त्यामुळे वेल्लोरच्या प्रसिद्ध सर्जन एच.एस. भट्ट यांनी अमिताभ यांचे सगळे रिपोर्ट पाहिले आणि त्यांच्या शरीरात इन्फेक्शन पूर्णपणे पसरले असून त्यांच्यावर तात्काळ ऑपरेशन करण्याची गरज असल्याचे सांगितले. ऑपरेशन करताना डॉक्टरांच्या लक्षात आले की, त्यांच्या पोटातील महत्त्वाच्या आतडीला प्रचंड दुखापत झाली होती. त्यांचे ऑपरेशन यशस्वी झाले. पण त्यानंतर त्यांना लगेचच निमोनिया झाला. त्यामुळे त्यांचे रक्त पातळ होत होते.

ब्लड डेंसिटी अतिशय कमी झाली होती. त्यामुळे मुंबईतून ब्लड डेंसिटी सुधारण्यासाठी ब्लड सेल्स मागवण्यात आल्या. त्यानंतर एक-दोन दिवसांनी त्यांची तब्येत सुधारली. पण पुन्हा त्यांना प्रचंड त्रास व्हायला लागला. त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णायलात दाखल करण्याचे डॉक्टरांनी ठरवले. मुंबईला आणल्यावर त्यांच्यावर पुन्हा ऑपरेशन करण्यात आले.  हे ऑपरेशन जवळजवळ आठ तास सुरू होते. पण इथेही त्यांना जीवन आणि मृत्यू यांच्यात दीर्घ लढा द्यावा लागला. दिला. कधीकधी श्वास घ्याला त्रास व्हायचा तर कधी रक्ताची कमतरता असायचीय. पण अमिताभ यांनी ती लढाई जिंकली. जवळजवळ 2 महिने त्यांचावर उपचार चालू राहिले.  अशा रितीने अमिताभ यांनी मृत्यूशी संघर्ष केला म्हणून त्यांचा हा दुसरा जन्म मानला जातो.   

टॅग्स :अमिताभ बच्चन