Join us  

'संजू'पाहून बॉलिवूडमधील हे दिग्गज झाले भावूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 3:12 PM

संजू चित्रपटपाहून बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांना अश्रू आवरण कठिण झाले आणि सोशल मीडियावर या चित्रपटाची सगळे जण खूप स्तुती करतायेत.

ठळक मुद्देसंजूमध्ये रणबीर कपूरशिवाय आणखीन कोणा अभिनेत्याच्या अभिनयाची चर्चा होत असेल तर हो आहे विक्की कौशल

रणबीर कपूरच्या संजू चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 34 कोटींची ऑपनिंग केली आहे. हा चित्रपट या वर्षाचा हिट बनू शकतो. संजूमध्ये रणबीर कपूरशिवाय आणखीन कोणा अभिनेत्याच्या अभिनयाची चर्चा होत असेल तर हो आहे विक्की कौशल.  संजू चित्रपटपाहून बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांना अश्रू आवरण कठिण झाले आणि सोशल मीडियावर या चित्रपटाची सगळे जण खूप स्तुती करतायेत. मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानने याचित्रपटाबाबत ट्वीट करताना लिहिले आहे, ''संजू चित्रपटात खूपच चांगला आहे. या चित्रपटात वडिल आणि मुलामधल्या नात्याला अतिशय सुरेखपणे पडद्यावर मांडले आहे. रणबीरशिवाय विक्की कौशलने सु्द्धा जबरदस्त अभिनय केला आहे. एक सुंदर चित्रपटासाठी राजकुमार हिरानींचे आभारी आहे.    

आमिरसह करण जोहरनेसुद्धा ट्वीटकरुन याचित्रपटाचे कौतुक केले आहे. करण लिहितो, विक्की कौशलने दमदार अभिनय केला आहे. चित्रपट बघताना मला अश्रू अनावर झाले. याचबरोबर मेघनाने लिहिले आहे, राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'संजू' हा एक उत्कृष्ट चित्रपट आहे. रणबीर आणि विक्कीचा अभिनय वाखाण्याजोग आहे.  

या चित्रपटासाठी रणबीरने अतिशय मेहनत घेतली आहे. सोनम कपूर, मनिषा कोईराला, परेश रावल यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटातील अनेक सीन शूट करताना रणबीर कपूर भावूक झाला होता. यातील एक सीन म्हणजे संजय दत्तची आई नर्गिस दत्त यांच्या मृत्यूचा सीन शूट केला जात होता, तेव्हा रणबीर सर्वात जास्त भावूक झाला होता. त्याने एका मुलाखतीत सांगितले की, 'संजय सरांच्या आईंच्या मृत्यूचा सीन सर्वात कठीण होता. त्या सीनवेळी मी फार भावूक झालो होतो. सीनमध्ये असं आहे की, सुनील दत्त यांना काही कामानिमित्त बाहेर जायचं होतं. त्यामुळे त्यांनी संजय सरांना हॉस्पिटलमध्ये आईजवळ थांबायचं सांगितलं होतं. ते हॉस्पिटलमध्ये चार-पाच दिवस होते'. 

टॅग्स :संजू चित्रपट 2018रणबीर कपूर