Join us  

चित्रपटातील बोल्ड दृश्य पाहून निर्मात्याने अभिनेत्रीकडे केली होती शरीरसुखाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 5:54 PM

पायलने आरएक्स १०० या तेलगू चित्रपटात काम केले होते. तिचा हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटात तिने अनेक बोल्ड सीन दिले होते. या चित्रपटामुळे एक बोल्ड अभिनेत्री म्हणून तिला ओळख मिळाली होती. या चित्रपटानंतर तिला एका चित्रपटाची ऑफर आली होती.

पायल राजपूत या अभिनेत्रीने सपनो से भरे नैना या मालिकेपासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिने महाकुंभ, आखिर बहू भी तो बेटी ही है, ये है आशिकी यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तिने मालिकांप्रमाणेच पंजाबी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील तिच्या अभिनयाने तिची एक जागा निर्माण केली आहे. तिच्या अनेक चित्रपटांना प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळाले आहे. पायलने नुकताच कास्टिंग काऊचविषयी एक धक्कादायक खुलासा केला आहे. पायलने कास्टिंग काऊचबाबत खुलासा करताना सांगितले आहे की, कामाच्या मोबदल्यात एका निर्मात्याने शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली होती. हे ऐकून पायलला चांगलाच धक्का बसला होता. 

पायलने आरएक्स १०० या तेलगू चित्रपटात काम केले होते. तिचा हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटात तिने अनेक बोल्ड सीन दिले होते. या चित्रपटामुळे एक बोल्ड अभिनेत्री म्हणून तिला ओळख मिळाली होती. या चित्रपटानंतर तिला एका चित्रपटाची ऑफर आली होती. त्यावेळेचा तिचा अनुभव खूपच वाईट होता. याविषयी पायल सांगते, माझ्याकडे नेहमीच चित्रपटाच्या स्क्रिप्ट येत असतात. एकदा एक निर्माता मला भेटायला आला होता. त्याने मला त्याच्या चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकवली आणि त्यानंतर त्याने मला जी गोष्ट बोलली, ती ऐकून तर मला चांगलाच धक्का बसला. कारण त्याने माझ्याकडे शरीरसंबंध ठेवण्याची ऑफर दिली होती. निर्मात्यांचे हे शब्द ऐकून मला धक्काच बसला होता. मला त्या व्यक्तीचा प्रचंड राग आला होता. मी चित्रपटात बोल्ड दृश्य दिली याचा अर्थ मी माझ्या खाजगी आयुष्यात कोणासोबतही शरीरसंबंध ठेवेल हा विचार करणे देखील चुकीचे आहे. केवळ पटकथेची गरज असल्याने मी त्यावेळी बोल्ड दृश्य दिले होते. ही घटना मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. काही दिवसांपूर्वीच तेलुगु अभिनेत्री श्री रेड्डीने कास्टिंग काऊचबद्दल टॉपलेस होऊन प्रदर्शन केले होते. कास्टिंग काऊटबद्दल मौन राखणाऱ्या अभिनेत्री आता कास्टिंग काऊचबद्दल खुलेपणाने बोलत आहेत.