Join us

बॉलीवूडने केली ‘मर्दानी’ची प्रशंसा

By admin | Updated: July 9, 2014 00:52 IST

आगामी ‘मर्दानी’ या चित्रपटात पोलीस अधिका:याची भूमिका निभावणारी राणी मुखर्जी सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.

आगामी ‘मर्दानी’ या चित्रपटात पोलीस अधिका:याची भूमिका निभावणारी राणी मुखर्जी सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या चित्रपटाचे ट्रेलर लाँच झाले असून समीक्षकांसह प्रेक्षकांनीही त्याला पसंती दिली आहे. या चित्रपटातून राणी मानव तस्करीसारख्या संवेदनशील मुद्दा प्रेक्षकांसमोर सादर करणार आहे. या चित्रपटात राणी पहिल्यांदाच रफ टफ भूमिका करताना दिसणार आहे. तिचा हा अॅक्शन अवतार बॉलीवूडलाही आवडला आहे. अनेक दिग्गजांनी राणीच्या या चित्रपटाची प्रशंसा केली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरबाबत आमिर खानने टि¦ट केले आहे की, ‘तुम्ही हे शानदार ट्रेलर पाहिले का? 22 ऑगस्टर्पयत प्रतीक्षा करणो माङयासाठी सोपे नाही.’ करण जाैहर म्हणतो, ‘मर्दानीचे धमाकेदार, जोरदार आणि जबरदस्त ट्रेलर. पुन्हा एकदा तिच्या अभिनयाची जादू पाहायला मिळणार.’ बिजॉय नांबियारने टि¦ट केले आहे की, ‘मर्दानीचे ट्रेलर
उत्कृष्ट आहे.’