Join us  

बॉलिवूड सेलिब्रिटींचे लकी चार्म

By admin | Published: July 11, 2016 12:00 AM

विद्या बालन - उ लाला.. उ लाला ... म्हणणारी विद्या बालन आज बॉलीवूडमध्ये मोठी अभिनेत्री आहे. तिची मेहनत ...

विद्या बालन - उ लाला.. उ लाला ... म्हणणारी विद्या बालन आज बॉलीवूडमध्ये मोठी अभिनेत्री आहे. तिची मेहनत अन् अभिनय या गोष्टी तर तिच्या सक्सेससाठी महत्त्वाच्या आहेतच परंतु विद्याचे लकी चार्मदेखील तितकेच महत्त्वाचे आहेत. विद्याच्या हातात तुम्ही काळ्या रंगाचे मोठ्या मण्यांचे ब्रेसलेट पाहाल. हे ब्रेसलेट नेहमीच तिच्या हातात असते. पाकिस्तानमधील हाश्मी काजल ती नेहमी लावते. या दोन गोष्टी तिच्यासाठी लकी असल्याचे ती सांगते.

रणबीर कपूर हँडसम हंक रणबीर कपूरच्या तर लाखो तरुणी दिवान्या आहेत पण त्याचा लकी चार्म आहे त्याची आई नीतू कपूर. होय आई नीतू कपूर ही त्याची लकी चार्म असल्याचे तो सांगतो तसेच रणबीरसाठी ८ हा आकडा लकी असल्याचे तो मानतो. रणबीरच्या गाडीचा नंबरदेखील ८ आहे.

बिपाशा बसू बोल्ड अँड ब्युटिफुल अभिनेत्री बिपाशा बसूचे तर जगभरात चाहते असतील पण आपली ही सुंदरा प्रेमात आहे लिंबू मिरचीच्या. हे ऐकून तुम्हाला थोडे विचित्र वाटेलही पण हेच खरे आहे. बिपाशाचा लिंबू-मिरचीवर विश्वास आहे. बिपाशाच्या कारमध्ये नेहमीच तुम्हाला लिंबू-मिरची लटकवलेले दिसेल. याविषयी बिपाशा सांगते की ‘मी दर शनिवारी लिंबू-मिरची विकत घेते अन् कारमध्ये लटकवते. लिंबू-मिरची आपल्याला वाईट शक्तींपासून वाचवते’ असे तिचे म्हणणे आहे.

शिल्पा शेट्टी बऱ्याच जणांना माहीत नसेल की शिल्पा शेट्टी तिच्या करंगळीमध्ये एक इमरॅल्ड रिंग घालते. ही रिंग नेहमीच तिच्या बोटात तुम्हाला पाहायला मिळेल. ही रिंग शिल्पाचा लकी चार्म रिंग असून आयपीएलच्या तिच्या टीमच्या मॅचेसवेळी शिल्पा दोन्ही हातात घड्याळे घालते. शिल्पाने ही रिंग घातल्यापासून तिचे तारे चमकले असे तिला वाटते.

सलमान खान बॉलीवूडचा दबंग स्टार सलमान याच्या यशाचे गमक काहीही असले तरी त्याच्या हातातील निळ्या रंगाच्या ब्रेसलेटकडे लक्ष वेधल्याशिवाय राहत नाही. सलमानच्या हातात फिरोजा नावाचे ब्रेसलेट नेहमी असते. हे ब्रेसलेट त्याला त्याच्या वडिलांनी गिफ्ट केले असल्याने तो ते नेहमी हातात घालतो तसेच फिरोजा हा खडा यश मिळण्यासाठीदेखील घातला जातो. आता सल्लूभाईच्या यशाकडे पाहता त्याला याचा नक्कीच फायदा झाला असे म्हणायला काहीच हरकत नाही.

अमिताभ बच्चन - बॉलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांचा नशिबावर व लकी चार्मवर प्रचंड विश्वास आहे. त्यांच्या हातात आपल्याला एक घड्याळ नेहमी दिसते. ते वॉच अमिताभ यांना त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांनी भेट म्हणून दिले होते त्यामुळेच अमितजी ते घड्याळ नेहमी सोबत बाळगतात. एवढेच नव्हे त्यांच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटात एक निळ्या खड्याची अंगठी तुम्हाला दिसेल. असे म्हणतात की अमितजींच्या पडत्या काळात त्यांनी ही अंगठी घातली होती.

बॉलिवूड सेलिब्रिटींचे लकी चार्म बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांचा नशिबावर खूप विश्वास आहे. आपल्या यशासाठी किंवा आयुष्यात येणाऱ्या सकारात्मक गोष्टींसाठी हे स्टार्स त्यांच्याजवळ काही "लकी चार्म" सदैव बाळगतात. पाहूया कोण आहेत ते सेलिब्रिटी आणि काय आहे त्यांचा लकी चार्म...