Join us  

बॉलिवूड बायोपिक्स

By admin | Published: March 29, 2016 12:00 AM

किशोर कुमार - ज्येष्ठ दिवंगत अभिनेते-गायक किशोर कुमार यांचे जीवन हे सर्वसामान्यांसाठी नेहमीच कुतुहलाचा विषय होता. दिग्दर्शक अनुराग बसू ...

किशोर कुमार - ज्येष्ठ दिवंगत अभिनेते-गायक किशोर कुमार यांचे जीवन हे सर्वसामान्यांसाठी नेहमीच कुतुहलाचा विषय होता. दिग्दर्शक अनुराग बसू किशोर कुमार यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवणार असून या चित्रपटातही अभिनेता रणबीर कपूरच किशोर कुमार यांची भूमिका करणार आहे.

नीरजा - १९८६ साली सप्टेंबर महिन्यात झालेल्या विमान अपहरणादरम्यान प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी स्वत:च्या जीवाचे बलिदान देणारी फ्लाईट अटेंडंट नीरजा भानोत हिच्या जीवनावर आधारित नीरजा हा चित्रपट नुकताच रिलीज झाला. अभिनेत्री सोनम कपूरने साकारलेली नीरजा भानोत शंभर टक्के जुळून आल्याने प्रेक्षकांनी हा चित्रपट उचलून धरला.

संजय दत्त - अभिनेता सुनील दत्त व अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा व अभिनेता संजय दत्त याच्या वादळी जीवनावर प्रकाश टाकणारा बायोपिक येणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती मात्र काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अभिनेता रणबीर कपूर यात मुख्य भूमिकेत दिसणार असून संजयचा अभिनेता म्हणून सुरू प्रवास त्याचे ड्रग अॅडिक्शन त्याची झालेली ३ लग्न १९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांदरम्यान बेकायदा शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी त्याला झालेली अटक तसेच त्याने तुरूंगात भोगलेली शिक्षा या सर्व गोष्टींचा या चित्रपटात आढावा घेण्यात येणार आहे.

अझर - बॉलिवूडमध्ये या वर्षी क्रिकेटर्सच्या जीवनावरील बायोपिक्सचा ट्रेंड असून धोनीप्रमाणेच माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन याच्या जीवनावरही एक चित्रपट येतोय. स्टार अभिनेता इम्रान हाश्मी यात मुख्य भूमिकेत झळकणार असून अझरच्या सुरूवातीच्या दिवसांपासून ते अभिनेत्री संगिता बिजलानीशी झालेले लग्न तसेच त्याच्यावर झालेले मॅच फिक्सिंगचे आरोप या सर्व घटनांचा चित्रपटात आढावा घेण्यात आला आहे.

सरबजीत - पाकिस्तानच्या हद्दीत चुकून प्रवेश केल्यानंतर पाकिस्तानमधील कारागृहात अनेक वर्षे तुरुंगवास भोगलेल्या सरबजीत सिंह या भारतीय नागरिकाच्या जीवनावर आधारित ‘सरबजीत’ या आगामी हिंदी चित्रपटात अभिनेता रणबीर हुडा ‘सरबजीत’ची भूमिका साकारत आहे. तर सरबजीत यांची बहीण दलबीर कौरची भूमिका अभिनेत्री ऐश्वर्या-राय बच्चन साकारत असून या रिच्चा चढ्ढाचीही चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहे. सरबजीत सिंह यांना अनेक वर्ष पाकिस्तानच्या कारागृहात डांबण्यात आले होते तेथे त्याचा छळ करण्यात आला. त्याच्या सुटकेसाठी कुटुंबीयांनी खूप प्रयत्न केले पण यशस्वी झाले नाहीत. अखेर कारागृहातच त्यांचा मृत्यू झाला.

दंगल - बॉलिवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खान या चित्रपटात माजी कुस्तीपटू आणि प्रशिक्षक महावीर सिंग यांच्या भूमिकेत दिसणार आहे. कॉमनवेल्थ गेम्ससाठी आपल्या दोन्ही मुली व भाचीला प्रशिक्षण देणा-या महावीर यांची भूमिका वठवण्यासाठी आमिर कठोर शारीरिक व मानसिक मेहनत घेत असून या चित्रपटात त्याच्यासोबत साक्षी तन्वर आणि राजकुमार रावही दिसणार आहे. आमिरच्या इतर चित्रपटांप्रमाणेच हा चित्रपटही यावर्षी ख्रिसमसच्या आसपास रिलीज होणार आहे.

रुस्तम - टिनू देसाईच्या रुस्तम या रोमँटिक थ्रिलरमध्ये अक्षय कुमार रुस्तम पावरी या नेव्ही ऑफिसरची भूमिका करणार आहे. पारसी समाजानं या देशाला दिलेल्या प्रचंड योगदानामुळे अक्षय पारसी लोकांचा फॅन असून पारसी अधिका-याची भूमिका साकारायला मिळत असल्यामुळे खूश आहे. या चित्रपटात अक्षयकुमार सोबत इलियाना डिक्रूझ आणि ईशा गुप्ता या हिरॉइन्स असतील अशी चर्चा आहे.

बॉलिवूडमध्ये सध्या ट्रेंड आहे तो "बायोपिक्स"चा.. प्रसिद्ध व्यक्तिमत्वांचा जीवनप्रवास पडद्यावर मांडण्यात बॉलिवूडचा हातखंडा असून मेरी कोम डर्टी पिक्चर भाग मिल्खा भाग नीरजा या चित्रपटांद्वारे हा ट्रेंड यशस्वी ठरल्याचे दिसून आले. आगामी काळात अनेक महत्वपूर्ण व्यक्तिमत्वांचा प्रवास आपल्याला मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. एम.एस.धोनी: दि अनटोल्ड स्टोरी - भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी याच्या जीवनावर आधारित चित्रपटात सुशांत सिंग राजपूत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. नीरज पांडे दिग्दर्शित या चित्रपटाकडून रसिकांच्या खूप अपेक्षा आहेत.