ईशा गुप्ताचा ‘हमशकल्स’ हा चित्रपट २० जूनला रिलीज होत आहे. ईशाच्या मते, ती या चित्रपटात हॉट आणि ग्लॅमरस दिसणार आहे. ईशा म्हणाली की, साजीद खान त्याच्या हिरोईन्सना हॉट आणि ग्लॅमरस लूकमध्ये सादर करण्यासाठी ओळखला जातो आणि या चित्रपटात मीही तशीच दिसणार आहे.’ ईशाने आजवर जन्नत-२, राज-३, चक्रव्यूहसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ईशाच्या मते, या चित्रपटात तिला जास्त ग्लॅमरस दाखवण्यात आलेले नाही; पण हमशकल्समध्ये तिच्या लूकवर जास्त लक्ष देण्यात आले आहे. साजीदसोबत काम करायची इच्छा असल्याने तिने हा चित्रपट केला.
‘हमशकल्स’मध्ये बोल्ड ईशा
By admin | Updated: June 20, 2014 11:11 IST