अनुराग कश्यपची मुख्य भूमिका असलेल्या धूमकेतू या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्पेंद्र मिश्र करणार असून, विक्रमादित्य मोटवानी चित्रपटाचा निर्माता आहे. बिग बी म्हणाले की,‘ धूमकेतू या चित्रपटात मी पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसेल. चित्रपटाची निर्मिती विक्रमादित्य मोटवानीची आहे आणि अनुराग कश्यप मुख्य भूमिकेत दिसेल.’ त्यांनी ब्लॉगवर काही फोटो पोस्ट करून लिहिले आहे की,‘ विक्रमने उडानसारखा उत्कृष्ट चित्रपट बनवला आहे. तो आणि त्याच्यासारखे विचार असणा:या निर्मात्यांनी देश आणि जागतिक मंचावर सन्मान मिळवणा:या अशा चित्रपटांमध्ये स्वत:ला सहभागी केले आहे.
धुमकेतूमध्ये बिग बी
By admin | Updated: June 23, 2014 23:36 IST