फरहान खान आणि अजरुन रामपाल यांच्या रॉक ऑन या चित्रपटाच्या सिक्वलचे शूटिंग पुढील वर्षातला सुरू होणार आहे. या चित्रपटासाठी सध्या आलिया भट्ट आणि श्रद्धा कपूरच्या नावाची चर्चा आहे. युनिटच्या सूत्रंनुसार चित्रपट निर्मात्याला एक चांगली गायिका असलेल्या अभिनेत्रीची निवड करायची आहे. आलियाने इम्तियाज अलीच्या हायवे या चित्रपटात सुहा साहा, तर हम्प्टी शर्मा की दुल्हनियाँमध्येही समझांवा गायिले आहे. आलियाला ऑफर मिळाली असून तिने अद्याप ती साईन के लेली नाही. दुसरीकडे श्रद्धाच्या नावावरही विचार सुरू आहे. श्रद्धानेही एक विलेन या चित्रपटात तेरी गलियाँ आणि हैदरमध्ये दो जहाँ हे गीत गायिले होते.