Join us

बालमन बजरंगी रंगले !

By admin | Updated: July 8, 2015 02:59 IST

बजरंगी भाईजान ईदच्या मुहूर्तावर झळकणार आहे. त्यानिमित्ताने या चित्रपटाचा मीडिया पार्टनर असलेल्या लोकमत समूहाने मुंबई परिसरातील बच्चेकंपनीसोबतच्या संवादाची चिल्लर पार्टी सलमान भाईजानसाठी

बजरंगी भाईजान ईदच्या मुहूर्तावर झळकणार आहे. त्यानिमित्ताने या चित्रपटाचा मीडिया पार्टनर असलेल्या लोकमत समूहाने मुंबई परिसरातील बच्चेकंपनीसोबतच्या संवादाची चिल्लर पार्टी सलमान भाईजानसाठी आयोजित केली होती. मेहबूब स्टुडिओत जमलेल्या या मुला-मुलींना बघून अचंबित आणि आनंदित झालेल्या सलमानने या मुक्त संवादाला जणू लहानग्यांच्या पत्रकार परिषदेचे रूप देऊन टाकले. मुलांच्या पुढ्यातल्या खुर्चीत बसायच्या आधीच त्याने प्रश्न फेकला... कार्ड आणलंय का? प्रेस कार्ड विचारतोय... तुम्ही प्रश्न विचारायला जमला आहात... प्रेसवाले बनून! त्यानंतर सवाल-जबाबाचा सिलसिला रंगतच गेला. प्रत्येकाचा प्रश्न गंभीरपणे ऐकणाऱ्या भाईजानने दिलेल्या मनमोकळ्या खेळकर उत्तरांनी मुलांच्या अंगात जणू बजरंगीचे चैतन्य संचारले!------------

रमजान ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या आपल्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाच्या प्रचारात गुंतलेल्या सलमान खानसाठी रविवारची संध्याकाळ संस्मरणीय ठरली. या चित्रपटाचा मीडिया पार्टनर असलेल्या ‘लोकमत समूहा’ने खास कार्यक्रम आयोजित केला होता. विशेष म्हणजे या कार्यक्रमात त्याची गाठ पत्रकारांशी नव्हती, तर छोट्या मुलांबरोबर त्याने कार्यक्रमाचा आनंद लुटला.विशाल हृदय असलेल्या सलमान खान याच्या मनात मुलांसाठी खास स्थान आहे. सलमान भलेही बॉलिवूडचा फार मोठा स्टार असला तरी तो जेव्हा मुलांमध्ये येतो तेव्हा तो त्यांच्यापैकीच एक बनून जातो हे विशेष. असाच अनुभव मुंबईतील मेहबूब स्टुडिओमध्ये ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या खास समारंभात ‘बजरंगी भाईजान’ सलमान खानने आपल्या छोट्या चाहत्यांसोबत वेळ घालवला तेव्हा आला. या छोट्या चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्याने मनमोकळी उत्तरेही दिली.तुमचा सगळ्यात आवडता खेळ कोणता, असा प्रश्न एका मुलाने विचारला. त्याच्या उत्तरात त्याने फुटबॉलपासून ते कबड्डीपर्यंत व टेनिसपासून विटी-दांडूपर्यंत सगळ्या खेळांचा उल्लेख करून मी थोडे थोडे सगळे खेळ खेळलो आहे, असे सांगितले. परंतु सायकलिंगचा खेळ मला खूप आवडतो व आताही मला जेव्हा वेळ मिळतो त्या वेळी मी सायकलिंग करतो, असे तो म्हणाला. मुंबईत मुलांना खेळण्यासाठी मैदानांच्या टंचाईचीही या वेळी चर्चा केली. तो म्हणाला की, एकीकडे खेळांची मैदाने कमीकमी होत आहेत व त्याचवेळी मुलांवर अभ्यासाचे ओझे एवढे वाढत आहे की त्यांना खेळण्यासाठी आवश्यक तेवढा वेळ मिळत नाही.मजान ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या आपल्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाच्या प्रचारात गुंतलेल्या सलमान खानसाठी रविवारची संध्याकाळ संस्मरणीय ठरली. या चित्रपटाचा मीडिया पार्टनर असलेल्या ‘लोकमत समूहा’ने खास कार्यक्रम आयोजित केला होता. विशेष म्हणजे या कार्यक्रमात त्याची गाठ पत्रकारांशी नव्हती, तर छोट्या मुलांबरोबर त्याने कार्यक्रमाचा आनंद लुटला.विशाल हृदय असलेल्या सलमान खान याच्या मनात मुलांसाठी खास स्थान आहे. सलमान भलेही बॉलिवूडचा फार मोठा स्टार असला तरी तो जेव्हा मुलांमध्ये येतो तेव्हा तो त्यांच्यापैकीच एक बनून जातो हे विशेष. असाच अनुभव मुंबईतील मेहबूब स्टुडिओमध्ये ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या खास समारंभात ‘बजरंगी भाईजान’ सलमान खानने आपल्या छोट्या चाहत्यांसोबत वेळ घालवला तेव्हा आला. या छोट्या चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्याने मनमोकळी उत्तरेही दिली.तुमचा सगळ्यात आवडता खेळ कोणता, असा प्रश्न एका मुलाने विचारला. त्याच्या उत्तरात त्याने फुटबॉलपासून ते कबड्डीपर्यंत व टेनिसपासून विटी-दांडूपर्यंत सगळ्या खेळांचा उल्लेख करून मी थोडे थोडे सगळे खेळ खेळलो आहे, असे सांगितले. परंतु सायकलिंगचा खेळ मला खूप आवडतो व आताही मला जेव्हा वेळ मिळतो त्या वेळी मी सायकलिंग करतो, असे तो म्हणाला. मुंबईत मुलांना खेळण्यासाठी मैदानांच्या टंचाईचीही या वेळी चर्चा केली. तो म्हणाला की, एकीकडे खेळांची मैदाने कमीकमी होत आहेत व त्याचवेळी मुलांवर अभ्यासाचे ओझे एवढे वाढत आहे की त्यांना खेळण्यासाठी आवश्यक तेवढा वेळ मिळत नाही.चिल्लर पार्टी आणि सलमान मध्ये रमलेला संवाद..

लहानपणी कोणते खेळ खेळायचात आणि तुमचा आवडता खेळ कुठला?मी झाडून सगळे खेळ खेळायचो. हॉकी, फुटबॉल, क्रिकेटपासून टेबलटेनिसपर्यंत आणि अगदी गोट्या, विटी-दांडूपर्यंत सगळे खेळ मनसोक्त खेळायचो. सगळे खेळ त्या त्या मोसमात थोडे का होईना खेळायचोच. पतंग तर आजही मनापासून उडवतो. पण माझा जीव सगळ्यात जास्त रमतो, तो सायकलिंगमध्ये.

आवडता प्राणी कोणता?मलाही तुमच्यासारखे सगळेच प्राणी आवडतात. विशेषत: कुत्रे आणि घोडे; शिवाय तुम्हाला आवडणारे ससे किंवा पक्षीही मला भावतात. पण कुत्र्यांवर माझा जास्त जीव आहे.

तुमच्या डॉगीचे नाव काय?आताच्या हवं की पहिल्यापासूनची हवीत. टायसन, मायसन आणि कितीतरी. गेल्या सहा महिन्यांत माझे तीन डॉगी गेले. आपल्यावर जिवापाड प्रेम करणारे डॉगी हे जग सोडून जातात तो क्षण खूप वेदनादायी असतो. खूप दु:ख होते.

या सिनेमाचा अनुभव कसा होता?ब्युटीफुल! खूप मज्जा आली.

कोणते रोल करायला आवडतात?मी आजपर्यंत जे रोल केले ते सगळे आवडले म्हणूनच केले.

डान्सची स्टाईल तुम्हाला कोण शिकवते?मी तुमच्यासारख्यांकडूनच स्टेप्स शिकतो. अलीकडेच रिअ‍ॅलिटी शोमध्ये गेलो होतो. तिथं दोन-चार स्टेप्स मिळवल्या. आज तुम्हाला भेटल्यावर एखादी आणखी मिळेल. सगळं तुमच्याकडूनच मिळतं.

बेस्ट फ्रेण्ड कोण?सोहेल खान, अरबाज खान, सलिम खान, अर्पिता असे खूप आहेत.

...आणि शाहरूख खान?(मनमुराद हसत) आधी नव्हता. पण नंतर झाला आणि आता आहे. बेस्टेस्ट नसला तरी चांगला फ्रेण्ड आहे; शिवाय आमिर खान आहे.

शाळेत असताना अभ्यासावरून ओरडा मिळायचा का?आमच्या वेळी ओरड्याची नव्हे, मार देण्याची पद्धत होती. भरपूर पिटाई व्हायची.

आईकडून जास्त पिटाई व्हायची की वडिलांकडून व्हायची?आईकडून जास्त मार पडायचा; पण वडिलांचा मार जास्त लागायचा.

आवडता पिक्चर कोणता?मैने प्यार किया... माझी पहिली मूव्ही!

बजरंगी भाईजानसाठी स्पेशल डाएट होतं का?नव्हतं. म्हणून तर काहीही खाऊ शकलो.