Join us  

‘मंगलमूर्ती मोरया’ गाण्याचे आॅडिओ रेकॉर्डिंग

By admin | Published: August 07, 2016 2:32 AM

गणेशोत्सव जवळ आल्याची चाहूल लागली आहे. या काळात रसिकांसाठी गणेशस्तुतिपर विविध गीते येण्यास सुरुवात झाली आहे. त्यातीलच एक 'मंगलमूर्ती मोरया' या गाण्याचे

गणेशोत्सव जवळ आल्याची चाहूल लागली आहे. या काळात रसिकांसाठी गणेशस्तुतिपर विविध गीते येण्यास सुरुवात झाली आहे. त्यातीलच एक 'मंगलमूर्ती मोरया' या गाण्याचे आॅडिओ रेकॉर्डिंग नुकतेच झाले. ज्येष्ठ गायक आनंद शिंदे प्रस्तुत विजया आनंद म्युझिक प्रायव्हेट लिमिटेड या प्रॉडक्शन कंपनीचा शुभारंभदेखील या निमित्ताने झाला. सांताक्रुझ येथील आजीवासन रेकॉर्डिंग स्टुडियोमध्ये 'मंगलमूर्ती मोरया' या पहिल्या गाण्याचा श्रीगणेशा करण्यात आला. मंदार चोळकर लिखित या गाण्याचे दिग्दर्शन स्वप्निल गोडबोले यांनी केले आहे. आदर्श शिंदे, अमितराज आणि स्वप्निल बांदोडकर या आघाडीच्या गायकांनी स्वरसाज चढविला आहे.