Join us  

अरुण नलावडे झळकणार तेरा दिवस प्रेमाचे या नाटकात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 4:48 PM

अरुण नलावडे यांनी गेल्या अनेक वर्षांत रंगभूमीवर देखील एकाहून एक हिट नाटकं दिली आहेत. आता ते तेरा दिवस प्रेमाचे या नाटकात ते झळकणार असून या नाटकात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे.

अरुण नलावडे यांनी श्वास, कायद्याचे बोला, संदूक, कॅरी ऑन मराठा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. मोठ्या पडद्याप्रमाणेच त्यांनी छोट्या पडद्यावर देखील त्यांची छाप सोडली आहे. का रे दुरावा, अवघाची संसार, शुभंकरोती यांसारख्या अनेक मालिकांमध्ये त्यांनी खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. ते सध्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 

अरुण नलावडे यांनी गेल्या अनेक वर्षांत रंगभूमीवर देखील एकाहून एक हिट नाटकं दिली आहेत. आता ते तेरा दिवस प्रेमाचे या नाटकात ते झळकणार असून या नाटकात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. नाटककार आनंद म्हसवेकर यांचे हे नाटक असून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. म्हसवेकर हे मागील अनेक वर्षं एकांकिका, हौशी आणि व्यावसायिक रंगभूमीवर लेखक, दिग्दर्शक, निर्माते म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या तेरा दिवस प्रेमाचे या नाटकाद्वारे एक गंभीर विषयी त्यांनी अतिशय विनोदी पद्धतीने मांडला आहे. १६ ऑगस्टला दादर येथील शिवाजी मंदिर येथे या नाटकाचा शुभारंभ होणार असून त्यानंतर सावित्रीबाई फुले नाट्यगृह (१७ ऑगस्ट), गडकरी रंगायतन (१८ ऑगस्ट), कालिदास नाट्यगृह (१९ ऑगस्ट), प्रबोधनकार ठाकरे नाटयगृह (२० ऑगस्ट) आणि २१ ऑगस्ट रोजी पुन्हा शिवाजी मंदिर असे सलग सहा दिवस या नाटकाचे प्रयोग होणार आहेत.

‘प्रयोग फॅक्टरी’ निर्मित व ‘जिव्हाळा’ प्रकाशित या नाटकाचे लेखन आनंद म्हसवेकर यांनी केले असून, शिरीष राणे हे या नाटकाचे दिग्दर्शक आहेत. अनुराधा सामंत या नाटकाच्या निर्मात्या आहेत. संदेश बेंद्रे यांनी या नाटकाच्या नेपथ्याची जबाबदारी सांभाळली आहे. मयुरेश माडगांवकर यांनी पार्श्वसंगीत दिले आहे. तर विनय आनंद यांची प्रकाशयोजना आहे. कार्यकारी निर्माता म्हणून विनय म्हसवेकर हे काम पाहात आहेत. अरुण नलावडे यांच्यासह माधवी दाभोळकर, संजय क्षेमकल्याणी, शर्वरी गायकवाड, मेघना साने, देवेश काळे आणि संजय देशपांडे हे कलाकार या नाटकात महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.

टॅग्स :अरुण नलावडे