Join us

अनुष्का रणवीरला समजते ‘सुशील लडका’?

By admin | Updated: July 28, 2016 01:55 IST

रणवीर सिंग आणि एक्स-अनुष्का शर्मा यांच्या ब्रेकअपनंतर ते आता एकमेकांचे चांगले मित्र आहेत. ब्रेकअपनंतरही त्या दोघांनी ‘दिल धडकने दो’मध्ये काम केले, तसेच नंतर

रणवीर सिंग आणि एक्स-अनुष्का शर्मा यांच्या ब्रेकअपनंतर ते आता एकमेकांचे चांगले मित्र आहेत. ब्रेकअपनंतरही त्या दोघांनी ‘दिल धडकने दो’मध्ये काम केले, तसेच नंतर ते दोघे एकमेकांच्या चित्रपटांचे प्रमोशन करतानाही आढळले. रणवीरने नुकतीच अनुष्का शर्मासोबत एका ब्रँडेड शॅम्पूसाठी जाहिरात केली आहे. रणवीरने इन्स्टाग्रामवर त्या दोघांचा एक व्हिडीओ शेअर केला असून, त्यात अनुष्का रणवीरचे गाल एकदम लाडाने ओढत आहे. त्याला कॅप्शन देण्यात आले आहे की, ‘हाये..कितना सुशील लडका है!’ वेल, फक्त अ‍ॅड्स किंवा छोटे-मोठे रोल्स नकोत, तर पुन्हा एकदा त्यांना चित्रपटात एकत्र पाहण्याची इच्छा आहे. नाही का?