Join us

एसआरके-दीपिकात ‘आॅल इज नॉट वेल’

By admin | Updated: August 8, 2015 23:58 IST

दीपिकाने चंदेरी दुनियेत किंग खानसोबत पहिले पाऊल ठेवले होते. कोणत्याही हीरोइनसाठी ड्रीम एन्ट्री असणारी संधी दीपिकाला मिळाली. त्यानंतर दोघांनी मिळून ‘चेन्नई एक्स्प्रेस’ आणि ‘हॅपी न्यू ईअर’

दीपिकाने चंदेरी दुनियेत किंग खानसोबत पहिले पाऊल ठेवले होते. कोणत्याही हीरोइनसाठी ड्रीम एन्ट्री असणारी संधी दीपिकाला मिळाली. त्यानंतर दोघांनी मिळून ‘चेन्नई एक्स्प्रेस’ आणि ‘हॅपी न्यू ईअर’सारखे २०० कोटी क्लबचे सिनेमे दिले. पण सध्या दोघांत काही तरी बिनसल्यासारखे वाटत आहे. इन्स्टाग्रामवर तिने ‘बाजीराव मस्तानी’चे पोस्टर शेअर करताना ‘#चॅलेंजअ‍ॅक्सेप्टेड’ (आव्हान स्वीकारले) असा हॅश टॅग दिला. येत्या डिसेंबर महिन्यात शाहरूखचा ‘दिलवाले’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ एकाच दिवशी रिलीज होत आहेत. दीपिकाने असे खुलेआम आव्हान देणे बहुधा शाहरूखला आवडले नसावे. त्यामुळेच दोघांचे संबंध जरा खराब झाल्याचे बोलले जात आहे. चूक लक्षात आल्यावर तिने हॅश टॅग डीलिट केला, पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. आता दीपिकाने एका प्रकारे युद्धाचे बिगुल तर वाजविले नाही ना?