बॉलीवूडमध्ये नव्याने पदार्पण करणा:या कलाकारांची तुलना जुन्या कलाकारांशी केली जात असते. बॉलीवूडमध्ये नव्याने पदार्पण करणा:या अभिनेत्रींमध्ये आघाडीवर असलेल्या आलिया भट्टची तुलना सध्या करीना कपूरशी केली जात आहे. प्रतिभावंत कलाकार असलेल्या आलियाला मिळालेल्या यशानंतर तिचे फॅन्स तिची तुलना करीनाशी करत आहेत. आलियाला या तुलनेने आनंद होत असला, तरी करीनाला मात्र ही गोष्ट अजिबात आवडलेली नाही. आलिया प्रतिभावंत अभिनेत्री आहे हे करीनालाही मान्य आहे; पण तिची तुलना स्वत:शी करणो तिला मान्य नाही. करीनाच्या मते अद्याप तिने बॉलीवूडच्या दुनियेला अलविदा केले नाही, मग अशी तुलना योग्य नाही. तिने ही गोष्ट आलियाला पहिला ब्रेक देणा:या करण जोहरलाही बोलून दाखवली आहे.