Join us

‘ऐ दिल है मुश्कील’मध्ये आलिया भट्टही?

By admin | Updated: October 17, 2016 02:07 IST

करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्कील’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता दिसून येत आहे.

करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्कील’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता दिसून येत आहे. रणबीर कपूर, ऐश्वर्या राय बच्चन, अनुष्का शर्मा आणि पाकिस्तानी अभिनेता फवाद खान यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या शाहरूख खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार, अशी खबर होती. आता आणखी एक नवी बातमी आहे. होय, करणची लाडकी आलिया भट्ट ही सुद्धा या चित्रपटात दिसणार असल्याचे कळतेयं. आलिया करणचा कुठलाही शब्द टाळू शकत नाही. करणने विचारले आणि आलियाने या चित्रपटात काम करण्यास होकार दिला. अर्थात यात आलिया कुठल्या भूमिकेत दिसणार आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या चित्रपटात रणबीर प्लेब्वॉयच्या भूमिकेत आहे. अनुष्का, ऐश्वर्यासोबतच तो लीजा हेडन हिच्यासोबतही रोमान्स करताना दिसणार आहे. आता या रांगेत आलिया भट्टही सामील होतेय की काय, ते बघूच!!