Join us

आलिया बनली आता मार्केटिंग गुरू !

By admin | Updated: May 30, 2014 09:30 IST

वरुण धवन आणि आलिया भट्टची जोडी पुन्हा एकदा ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनियाँ’ या चित्रपटात दिसणार आहे.

वरुण धवन आणि आलिया भट्टची जोडी पुन्हा एकदा ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनियाँ’ या चित्रपटात दिसणार आहे. आलियाचे सेल्फी प्रेम जगजाहीर आहे. सध्या एकीकडे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नवनव्या शक्कल लढवल्या जात आहेत, तर दुसरीकडे आलियाने तिच्या फिल्मच्या प्रमोशनसाठी सेल्फीची निवड केली आहे. आलिया आता ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनियॉँ’ची मार्के टिंग गुरूही बनली आहे. आलियाने तिचा कोस्टार वरुण धवनसोबत घेतलेला सेल्फी या चित्रपटाच्या एका पोस्टरवर दिसत आहे. पोस्टरमध्ये आलिया आणि वरुण यांनी रंगीत चष्मा घातलेला आहे. बॉलीवूडच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा सेल्फीचा वापर एखाद्या पोस्टरसाठी केला जात आहे.