प्रियंका चोप्रा आणि अक्षयकुमार यांची सोबत ट्ंिवकल खन्नाला जराही आवडत नाही; पण आता ट्ंिवकलच्या नाराजीची पर्वा न करता नुकतेच अक्षयने प्रियंकाची भेट घेतल्याची बातमी आहे. सूत्रंनुसार अक्षयने या भेटीत ‘सिंह इज ब्लिंग’ या आगामी चित्रपटाबाबत प्रियंकाशी चर्चा केली. या चित्रपटात प्रियंकाने काम करावे अशी त्याची इच्छा आहे. प्रियंकाने अक्षयची ऑफर स्वीकारली तर ब:याच वर्षानी ही जोडी एकत्र दिसेल; पण त्यानंतर ट्ंिवकलची काय प्रतिक्रिया असेल तेही पाहणो महत्त्वाचे ठरेल. अंदाज, ऐतराज, फॅमिली, मुझसे शादी करोगी सारख्या सुपरहिट चित्रपटांची ही जोडी तोडण्यामागे ट्ंिवकलचा हात असल्याचे म्हटले जाते.
अक्षय-प्रियंका पुन्हा साथ साथ
By admin | Updated: June 23, 2014 23:34 IST