Join us

अक्षयला करायचाय, चरित्रप्रधान चित्रपट

By admin | Updated: June 9, 2014 14:52 IST

बॉलीवूडचा ‘खिलाडी’ आता नुसते व्यावसायिक चित्रपट करून वैतागला आहे. त्याला आता एखाद्या चांगल्या चरित्रप्रधान चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे.

बॉलीवूडचा ‘खिलाडी’ आता नुसते व्यावसायिक चित्रपट करून वैतागला आहे. त्याला आता एखाद्या चांगल्या चरित्रप्रधान चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे. अक्षय म्हणतो, ‘एखादा निर्माता चरित्रप्रधान चित्रपटाची ऑफर घेऊन आला तर ती भूमिका साकारण्यात निश्‍चितच आनंद वाटेल; परंतु ही भूमिका मला डोळ्यासमोर ठेवून लिहिलेली असावी. मी आतापर्यंत सतत वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारण्याला प्राधान्य दिलेले आहे. आता मला चरित्रप्रधान चित्रपट करण्याची इच्छा आहे.’ वास्तविक आजकाल चरित्रप्रधान चित्रपटांपेक्षा व्यावसायिक चित्रपटांना प्राधान्य दिले जात आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकांचा ओढाही व्यावसायिक चित्रपटांकडेच आहे. अशा परिस्थितीत अक्षयने चरित्रप्रधान भूमिका साकारण्याचा मनोदय व्यक्त केल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.