Join us

‘शमिताभ’साठी अक्षराचे कठोर परिश्रम

By admin | Updated: December 15, 2014 00:12 IST

कोणत्याही नवीन गोष्टी आत्मसात करण्यात अक्षराचा हातखंडा असून, हिंदी भाषेचे प्रशिक्षण तिने नियोजित वेळेआधीच पूर्ण केले.

आर. बाल्कीच्या ‘शमिताभ’ या चित्रपटाद्वारे कमल हसनची छोटी मुलगी अक्षरा हसन हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे. महानायक अमिताभ बच्चन आणि धनुष हे या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. ‘शमिताभ’च्या शुटिंगदरम्यान कॅमेऱ्याचा पहिल्यांदाच सामना करीत असलेली अक्षरा ही भविष्यातील मोठी देणगी असल्याची स्तुतिसुमने अमिताभने यापूर्वीच उधळली आहेत. आपल्या भूमिकेचे सोने करण्यासाठी अक्षरा कठोर परिश्रम घेत आहे. २३ वर्षीय अक्षरा स्वत:ला भूमिकेत सामावून घेण्यासाठी मेहनत घेत आहे. त्यासाठी तिने थिएटर डायरेक्टर एन. के. शर्माकडून हिंदी भाषेचे खास प्रशिक्षणही घेतले आहे. कोणत्याही नवीन गोष्टी आत्मसात करण्यात अक्षराचा हातखंडा असून, हिंदी भाषेचे प्रशिक्षण तिने नियोजित वेळेआधीच पूर्ण केले.