Join us

आयुषमानला आवडतो रेल्वेचा प्रवास

By admin | Updated: May 27, 2016 02:18 IST

सेलीब्रिटी चित्रपटांत काम करताना कधी रेल्वेतून जाताना दिसतात का? वास्तविक आयुष्यात मात्र ते एरोप्लेनने जाणेच पसंत करतात. पण, तुम्हाला माहितीये का असा एक सेलीब्रिटी

सेलीब्रिटी चित्रपटांत काम करताना कधी रेल्वेतून जाताना दिसतात का? वास्तविक आयुष्यात मात्र ते एरोप्लेनने जाणेच पसंत करतात. पण, तुम्हाला माहितीये का असा एक सेलीब्रिटी आहे ज्याला खऱ्या आयुष्यातही रेल्वेने प्रवास करायला खूप आवडते. तो म्हणजे ‘दम लगा के हैशा’ चित्रपटाचा अभिनेता आयुषमान खुराणा. चंदीगढला त्याच्या घरी जाण्यासाठी त्याला प्लेनपेक्षा ट्रेननेच जाणे जास्त आवडते. बरं, आता याचे कारण फार वेगळे आहे. त्याविषयी सांगताना तो म्हणतो, ‘रेल्वेचा प्रवास आवडण्याचे एकमेव कारण हे भूतकाळातील आठवणींशी निगडित आहे. माझी आई दिल्लीची होती. म्हणून आम्ही उन्हाळ्यात शताब्दी एक्स्प्रेसने जात असू. मला आठवतेय की, त्या वेळी पश्चिम एक्स्प्रेस आणि राजधानी एक्स्प्रेस या दोन प्रकारच्या ट्रेन्स जात होत्या. तसेच जेव्हा मी थिएटर करत होतो त्या वेळीही चंदीगढ ते मुंबई हा प्रवास रेल्वेतूनच करायचो.’