अभिनेता ऋतिक रोशन आणि डॅनी डेंजोपा जवळपास 28 वर्षानी ‘बँग बँग’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. यापूर्वी दोघे भगवानदादा या चित्रपटात एकत्र दिसले होते. 1986 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटात ऋतिक बालकलाकार होता. चित्रपटात रजनीकांत, श्रीदेवी, टिना मुनीम मुख्य भूमिकेत होते. टिनाशी गैरवर्तन करणा:या शंभूला ऋतिक पायाने मारण्याचा प्रयत्न करतो. जवळपास 28 वर्षानंतर ऋतिक डॅनी यांना त्याच अंदाजात बँगबँगमध्ये मारताना दिसेल. बँग बँग 2 ऑक्टोबरला रिलीज होत आहे.