Join us

आदिनाथ-तेजसने दिला गौतम राजाध्यक्ष यांच्या आठवणींना उजाळा

By admin | Updated: October 17, 2016 02:08 IST

आदिनाथ कोठारेने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात २०१० मध्ये केली होती.

आदिनाथ कोठारेने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात २०१० मध्ये केली होती. त्याने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्याचे पहिले फोटोशूट प्रसिद्ध फोटोग्राफर गौतम राजाध्यक्ष यांच्यासोबत केले होते. गौतम राजाध्यक्षसारख्या महान फोटोग्राफरसोबत फोटोशूटचा त्याचा अनुभव हा अविस्मरणीय असल्याचे तो सांगतो. या फोटोशूटच्या वेळी आजचा आघाडीचा फोटोग्राफर तेजस नेरुरकर हा त्यांचा सहायक होता. या फोटोशूटपासूनच आदिनाथ आणि तेजसची खूपच चांगली मैत्री जमली आहे. तेजस आणि आदिनाथने गौतम राजाध्यक्ष यांच्या जयंतीला म्हणजेच १६ सप्टेंबरला एक खास फोटोशूट केले. या फोटोशूटल त्या दोघांनी गौतम राजाध्यक्ष यांच्या आठवणींना उजाळा दिला. या फोटोशूटचे वैशिष्ट्य म्हणजे गौतम यांनी ज्या पोजमध्ये आदिनाथचा एक फोटो काढला होता त्याच पोजमध्ये तेजसने आदिनाथचा फोटो काढला. याविषयी आदिनाथ सांगतो, ‘गौतम राजाध्यक्ष यांनी आपले फोटो काढावेत, अशी अनेकांची इच्छा असायची; पण हे स्वप्नं पूर्ण होणे हे सगळ्यांसाठी शक्य नसते; पण मला त्यांच्यासोबत फोटोशूट करायला मिळाले होते. माझे त्यांनी काढलेले फोटो खूपच सुंदर आले होते. तेजसदेखील खूपच चांगले फोटो काढतो. त्यामुळे तेजस या त्यांच्या शिष्याने आणि मी त्यांच्या जयंतीला फोटोशूट केले. तेजसनेदेखील त्याच पोजमध्ये माझा खूप छान फोटो काढला आहे.