Join us

शाहरुखच्या शूटिंगमध्ये अबरामचा व्यत्यय

By admin | Updated: June 9, 2014 14:52 IST

चक्क एका लहान मुलामुळे शाहरुख खानच्या आगामी ‘हॅप्पी न्यू ईअर’ची शूटिंगमध्ये व्यत्यय आला.

चक्क एका लहान मुलामुळे शाहरुख खानच्या आगामी ‘हॅप्पी न्यू ईअर’ची शूटिंगमध्ये व्यत्यय आला. किंग खानच्या कामात खोळंबा करणारा हा मुलगा दुसरा तिसरा कुणी नसून त्याचाच छोटा मुलगा अबराम आहे. शाहरुख सध्या ‘हॅपी न्यू ईअर’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सेटवर शाहरुख छोट्या अबरामला घेऊन पोहोचला. अबरामचे येताच शूटिंग थांबली. सेटवर उपस्थित सर्वांच्या नजरा अबरामवर खिळल्या. शाहरुख आणि गौरीने अबरामला सेरोगेसी तंत्राने जन्म दिला आहे. नुकताच अबराम एक वर्षाचा झाला. शाहरुख आणि गौरी सतत त्याला माध्यमांच्या नजरेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे विशेष.