आपल्या चित्रपटात नवनवीन प्रयोग करण्याबाबत दिग्दर्शक नीरज पांडे ओळखला जातो. ‘स्पेशल २६’ मधून प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या नीरजचा ‘बेबी’ हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल. या चित्रपटात नीरज आणखी एक प्रयोग करणार आहे. हॉलीवूडपटाच्या धर्तीवर या चित्रपटात एकही गाणे न ठेवण्याचा निर्णय नीरजने घेतला आहे. ‘बेबी हा एक थ्रीलर, अॅक्शनपट असून, त्यात गाण्याची कसलीही गरज नाही. चित्रपटांचे प्रेक्षकही आता चोखंदळ झाले आहेत. गाणे, नृत्य, अशा पारंपरिक गोष्टीला टाळण्याची त्यांची मानसिकता झाली आहे,’ असे नीरजने सांगितले. या चित्रपटात भूमिका साकारत असणाऱ्या अनुपम खेरने काही दिवसांपूर्वी चित्रपटात एका गाण्याचा समावेश केल्याचे सुतोवाच केले होते. चित्रपटाच्या प्रमोशनच्यावेळी गाण्याचा वापर केला जाईल, असेही अनुपमने म्हटले होते.
अक्षयचा ‘बेबी’ असेल गाणेविरहित
By admin | Updated: December 15, 2014 00:08 IST