Join us

८ पॅक्स अ‍ॅब्जचे आकर्षण नाही

By admin | Updated: December 1, 2014 00:31 IST

इतर अभिनेत्यांप्रमाणे सिक्स किंवा एट पॅक्स अ‍ॅब्जच्या पाठीमागे धावण्याची अभिनेता अजय देवगणची इच्छा नाही. पॅक्स अ‍ॅब्ज दाखविण्याऐवजी स्वत:चे शरीर धष्टपुष्ट कसे दिसेल,

इतर अभिनेत्यांप्रमाणे सिक्स किंवा एट पॅक्स अ‍ॅब्जच्या पाठीमागे धावण्याची अभिनेता अजय देवगणची इच्छा नाही. पॅक्स अ‍ॅब्ज दाखविण्याऐवजी स्वत:चे शरीर धष्टपुष्ट कसे दिसेल, याचीच काळजी तो घेत असतो. चित्रपटाचा नायक पडद्यावर धडधाकट दिसावा अशी ‘अ‍ॅक्शन जॅक्सन’च्या निर्मात्यांची इच्छा होती. माझ्यासाठी ते सहजशक्य काम होते. सिक्स किंवा ऐट पॅक्स अ‍ॅब्जमुळे तुम्ही रुबाबदार दिसता यात शंका नाही; परंतु त्यामुळे शरीरात एक प्रकारे कमजोर होत असते. एट पॅक्स अ‍ॅब्जची मला कधीच भुरळ पडली नाही. त्याऐवजी शरीर धष्टपुष्ट राखण्यासाठीच मी मेहनत घेत असतो, असे अजय म्हणाला. अजयचा ‘अ‍ॅक्शन जॅक्सन’ हा मसाला चित्रपट येत्या पाच डिसेंबर रोजी रिलीज होत आहे. सोनाक्षी सिन्हा ही या चित्रपटात त्याची हिरोईन आहे. प्रभू देवा दिग्दर्शित या चित्रपटाकडून त्याला मोठ्या अपेक्षा आहेत.