Join us

१८ आॅक्टोबरला दियाचे शुभमंगल

By admin | Updated: July 31, 2014 23:18 IST

बॉलीवूड अभिनेत्री दिया मिर्जा आणि तिचा प्रियकर साहील संघा येत्या आॅक्टोबर महिन्यात बोहल्यावर चढणार आहेत.

बॉलीवूड अभिनेत्री दिया मिर्जा आणि तिचा प्रियकर साहील संघा येत्या आॅक्टोबर महिन्यात बोहल्यावर चढणार आहेत. दियाने दिलेल्या माहितीनुसार हे लग्न १८ आॅक्टोबरला होणार आहे. दिल्लीमध्ये हा लग्नसोहळा आयोजित करण्यात येणार असून, या सोहळ्याला काही नातेवाईक आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दिया मुंबईत बॉलीवूडमधील मित्रांसाठी रिसेप्शन देणार आहे. साहील हा दिल्लीचा असल्याने येथेच लग्न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. दियानुसार त्यांच्या कुटुंबियांनी तारीख आणि स्थान ठरवले आहे.