Upcoming IPOs: २०२६ भारतीय शेअर बाजारासाठी अत्यंत महत्त्वाच्या घडामोडींनी भरलेला ठरणार आहे. यावर्षी देश-विदेशातील अनेक मोठ्या आणि नामांकित कंपन्यांचे आयपीओ (IPO) बाजारात दाखल होण्याची शक्यता असून, गुंतवणूकदारांसाठी कमाईची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. Zomato, Delhivery आणि Nykaa यांसारख्या कंपन्यांच्या यशस्वी लिस्टिंगनंतर आता Reliance Jio, Flipkartसह अनेक दिग्गज कंपन्या आपले IPO आणण्याच्या तयारीत आहेत.
Reliance Jio IPO
रिलायन्स जिओचा IPO २०२६ च्या पहिल्या सहा महिन्यांत येण्याची दाट शक्यता आहे. अहवालांनुसार, कंपनी IPOच्या माध्यमातून ४ ते ४.५ अब्ज डॉलर्स (सुमारे ३५,००० ते ४०,००० कोटी रुपये) उभारू शकते. काही अंदाजानुसार ही रक्कम ५२,००० कोटी रुपयांपर्यंतही जाऊ शकते. रिलायन्स जिओ IPO द्वारे सुमारे २.५ टक्के हिस्सा विकण्याचा विचार करत असल्याचे सांगितले जाते.
Flipkart IPO
वॉलमार्टच्या मालकीची ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी Flipkart देखील शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत आहे. कंपनी IPO द्वारे ८ ते १० अब्ज डॉलर (सुमारे ६७,००० ते ८३,००० कोटी रुपये) उभारण्याचे लक्ष्य ठेवत असल्याची माहिती आहे. हा IPO २०२६ च्या पहिल्या तिमाहीत किंवा मध्यापर्यंत येऊ शकतो. हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO ठरू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
NSE IPO
नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा IPO बराच काळ चर्चेत आहे. अहवालांनुसार, NSE सुमारे ४७,५०० कोटी रुपये उभारण्यासाठी बाजारात उतरू शकते. या IPOकडे गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष लागले आहे.
PhonePe IPO
फिनटेक क्षेत्रातील आघाडीची कंपनी PhonePe देखील IPOच्या रांगेत आहे. PhonePe IPO द्वारे १.२ ते १.५ अब्ज डॉलर्स उभारण्याची शक्यता आहे.
स्टार्टअप कंपन्यांचे IPO
२०२६ मध्ये केवळ मोठ्या कंपन्याच नव्हे, तर अनेक स्टार्टअप्सही बाजारात उतरणार आहेत. यामध्ये Zepto, OYO, boAt, PharmEasy यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्या आपल्या विस्तार आणि विकास प्रकल्पांसाठी बाजारातून निधी उभारण्याच्या तयारीत आहेत.
फायनान्शियल सेक्टरमधील IPO
SBI Mutual Fund IPO: देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंड हाऊसच्या IPO ची गुंतवणूकदार उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
Hero Fincorp आणि Hero Motors: हीरो समूहातील या दोन कंपन्यांचे IPO देखील २०२६ मध्ये येण्याची शक्यता असून, त्याकडे बाजाराचे लक्ष आहे.
गुंतवणूकदारांसाठी संधी आणि सावधगिरी
२०२६ मध्ये येणारे हे मेगा IPO भारतीय शेअर बाजाराला नवे बळ देऊ शकतात. मात्र, मोठ्या नावांबरोबरच मूल्यांकन, कंपनीची आर्थिक स्थिती आणि दीर्घकालीन वाढीची क्षमता तपासूनच गुंतवणूक करणे आवश्यक ठरणार आहे.
(विशेष सूचना- कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)