Join us
Daily Top 2Weekly Top 5

ICICI Prudential IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आज अखेरची संधी; GMP ₹३०० च्या पार, धमाकेदार लिस्टिंगचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 12:35 IST

ICICI Prudential AMC IPO: आयसीआयसीआय प्रुडेन्शियलचा आयपीओ दोन दिवसांत दुप्पटीहून अधिक सबस्क्राइब झाला आहे. यात गुंतवणूक करण्याची आज अखेरची संधी आहे.

ICICI Prudential AMC IPO: आयसीआयसीआय प्रुडेन्शियलचा आयपीओ (ICICI Prudential AMC IPO) दोन दिवसांत दुप्पटीहून अधिक सबस्क्राइब झाला आहे. या आयपीओमध्ये आज, १६ डिसेंबर रोजी, बोली लावण्याची शेवटची संधी आहे. ग्रे मार्केटमध्येही कंपनीचा आयपीओ पहिल्यांदाच ३०० रुपयांच्या पुढे गेला आहे, जी बोली लावणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी चांगली बातमी आहे.

जीएमपी किती आहे? (ICICI Prudential AMC IPO GMP Today)

आयसीआयसीआय प्रुडेन्शियलचा आयपीओ ग्रे मार्केटमध्ये ३०२ रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत आहे. 'इन्व्हेस्टर्स गेन'च्या रिपोर्टनुसार, ग्रे मार्केटमध्ये हा आयपीओ सुमारे १४ टक्क्यांच्या लिस्टिंग गेनचे संकेत देत आहे. आज आयसीआयसीआय प्रुडेन्शियलचा आयपीओ सर्वात जास्त जीएमपीवर ट्रेड करत आहे. या कंपनीचा सर्वात कमी जीएमपी ८५ रुपये होता.

ट्रम्प टॅरिफची हवा निघाली, भारताकडून अमेरिकेची जोरदार खरेदी; चीनही टॉप ३ मध्ये, पाहा अधिक माहिती

दोन दिवसांत दुप्पट सबस्क्राइब

हा आयपीओ सुरुवातीच्या दोन दिवसांत २.०३ पट सबस्क्राइब झाला. किरकोळ श्रेणीत आयपीओ ०.८३ पट सबस्क्राइब झाला. क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्स (QIB) श्रेणीत आयपीओ २.९१ पट आणि नॉन-इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स (NII) श्रेणीत ३.३६ पट सबस्क्राइब झाला आहे.

प्राइस बँड काय?

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसी आयपीओचा प्राइस बँड २०६१ रुपये ते २१६५ रुपये निश्चित करण्यात आला आहे. कंपनीनं ६ शेअर्सचा एक लॉट बनवला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना कमीत कमी १२,९९० रुपयांची बोली लावावी लागेल.

अँकर गुंतवणूकदारांकडून ₹३०२१ कोटी जमा

आयपीओसाठी सिटी ग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला लीड मॅनेजर म्हणून नियुक्त केलं आहे आणि केफिन टेक्नॉलॉजी लिमिटेडला रजिस्ट्रार म्हणून नियुक्त केलंय. हा एक मेनबोर्ड आयपीओ असल्यामुळे, याची लिस्टिंग बीएसई (BSE) आणि एनएसई (NSE) वर होईल. हितीनुसार, अँकर गुंतवणूकदारांसाठी आयसीआयसीआय प्रुडेन्शियल आयपीओ ११ डिसेंबर रोजी खुला झाला होता. कंपनीनं अँकर गुंतवणूकदारांकडून ३०२१.७६ कोटी रुपये जमा केले आहेत.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : ICICI Prudential IPO: Last chance today, GMP soars, strong listing expected.

Web Summary : ICICI Prudential AMC IPO closes today, with subscriptions oversubscribed. GMP crosses ₹300, hinting at a strong listing. The IPO was subscribed 2.03 times in two days, with anchor investors contributing ₹3021 crore. Price band is ₹2061-₹2165 per share.
टॅग्स :आयसीआयसीआय बँकइनिशिअल पब्लिक ऑफरिंगगुंतवणूक