Join us  

Tata चा हा शेअर रॉकेट बनला, 91000% नी वाढून ऑल टाइम हायवर पोहोचला; देतोय बम्पर परतावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2023 5:15 PM

टायटनच्या शेअरची 52 आठवड्यांतील नीचांकी पातळी 1827.15 रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सवर झुनझुनवाला कुटुंबाने मोठा डाव लावला आहे.

टाटा समूहाची कंपनी असलेल्या टायटनच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी आली आहे. या कंपनीचा शेअर 3 रुपयांवरून 3000 रुपयांपर्यंत पोहोचण्याच्या तयारीत आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी लोकांना तब्बल 91000% पेक्षाही अधिकचा परतावा दिला आहे. टायटनचा शेअर्स शुक्रवारी अर्थात 2 जून 2023 ला BSE वर 2871.50 रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीच्या शेअरचा हा आतापर्यंत उच्चांक आहे. टायटनच्या शेअरची 52 आठवड्यांतील नीचांकी पातळी 1827.15 रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सवर झुनझुनवाला कुटुंबाने मोठा डाव लावला आहे.

टायटनच्या शेअरने 1 लाखाचे केले 9 कोटी रुपये -  टायटनचा शेअर 6 जून 2003 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 3.13 रुपयांवर ट्रेडिंग करत होते. तो 2 जून 2023 ला 2871.50 रुपयांवर पोहोचला आहे. या काळात टायटनच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 91227% एवढा परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने 6 जून 2003 रोजी टायटनच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि आपली ते कायम ठेवले असते, तर या शेअर्सचे मूल्य आता 9.1 कोटी रुपये झाले असते. आम्ही आमच्या कॅल्क्युलेशनमध्ये टायटनने जारी केलेले बोनस शेअर्स विचारात घेतलेले नाहीत. जून 2011 मध्ये, टायटनने 1:1 च्या प्रमाणात बोनस शेअर जारी केले होते.

झुनझुनवाला कुटुंबाकडे 46945970 शेअर्स -राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटन कंपनीचे 46945970 शेअर्स अथवा 5.29 टक्के हिस्सेदारी आहे. हिस्सेदारीचा हा डेटा मार्च 2023 तिमाहीपर्यंतचा आहे. झुनझुनवाला फॅमिलीकडे डिसेंबर 2022 तिमाहीत टायटनचे 45895970 शेअर अथवा 5.17 टक्के हिस्सेदारी होती. दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे 14 ऑगस्ट 2022 रोजी निधान झाले आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) 

टॅग्स :टाटाशेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक