Join us  

390 रुपयांवरून आपटून ₹12 वर आला हा शेअर; आता गुंतवणूकदारांना मिळाली ' गुड न्यूज'!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2023 3:54 PM

आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी सुझलॉन एनर्जीचा शेअर 6 टक्क्यांपर्यंत वधारला.

रिन्यूएबल एनर्जी सोल्यूशन्स प्रोव्हायडर सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी दिसून येत आहे. गेल्या महिनाभरात कंपनीला बऱ्याच चांगल्या बातम्या मिळाल्या आहेत. याचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवरही झाला आहे आणि या शेअरने केवळ मे महिन्यात 45 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. महत्वाचे म्हणजे जून महिन्यातही हा शेअर जबरदस्त परतावा देत आहे.

शेअरची किंमत -आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी सुझलॉन एनर्जीचा शेअर 6 टक्क्यांपर्यंत वधारला. 20 डिसेंबर 2022 रोजी हा शेअर 12.19 रुपये या 52 आठवड्यांतील उच्चांकावर होता. तसेच 28 जुलै 2022 रोजी तो 5.43 रुपयांवर होता. हा 52 आठवड्यांतील निचांक आहे. सुझलॉनच्या शेअरने 390 रुपयांची पातळी गाठली आहे. याचा विचार करता, हा शेअर जवळपास 96 टक्क्यांनी आदळला आहे. मात्र, गेल्या एका वर्षात वेगवेगळ्या अवधीत पॉझिटिव्ह परतावा दिला आहे.

पॉझिटिव्ह बातम्यांचा परिणाम - गेल्या महिन्यात सुझलॉन एनर्जीला मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स मिळाल्या. याचा परिणाम शेअर री-बाउंड होण्यावर झाला आणि आता ग्रूपने जगभरात 20 गीगावॉटची स्थापित विंड टर्बाइन क्षमता प्राप्त केली आहे. याच बरोबर, “सुझलॉन ग्रुपने सहा खंडांमध्ये पसरलेल्या 17 देशांमधील स्थित 12,467 विंड टर्बाइनद्वारे 20 गिगावॉट पवन ऊर्जेचा टप्पा ओलांडला असून, यामुळे, सुझलॉनची स्थिती ग्लोबल विंड एनर्जी आऊटलुकमध्ये एक महत्वाची कंपनी म्हणून मजबूत झाली आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक