Join us

धमाका शेअर...! 100 रुपयांपेक्षाही किमी किंमतीच्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, आतापर्यंत दिलाय 26500% परतावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 17:25 IST

या मल्टिबेगस स्टॉकमध्ये आज अप्पर सर्किट लागले असले तरी, गेले एक वर्ष मात्र गुंतवणूकदारांसाठी चांगले राहिलेले नाही...

शेअर बाजारातील पडझडीतही आज एका शेअरने चांगली कामगिरी केली आहे. या शेअरचे नाव आहे मर्क्युरी ईवी टेक लिमिटेड (Mercury Ev-Tech Ltd). या कंपनीच्या शेअर्सला 5 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले आहे. यानंतर बीएसईवर हा शेअर 90.48 रुपयांवर पोहोचला आहे. महत्वाचे म्हणजे, हा शेअर बीएसईवर 86.93 रुपयांच्या पातळीवर खुला झाला होता.

2019 मध्ये 30 पैसे होता भाव -मर्क्युरी इव्ही टेकच्या शेअरची किंमत 2019 मध्ये केवळ 30 पैसे एवढी होती. तेव्हापासून कंपनीच्या शेअरने तब्बल 265111 टक्क्यांचा बंपर परतावा दिला आहे.  BSE वर कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांक 139.20 रुपये तर नीचांकी 64.32 रुपये प्रति शेअर एवढा आहे. कंपनीचे मार्केट कॅप 1570 कोटी रुपये आहे.

17 डिसेंबरला कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, "त्यांना नवीन उपकंपनी स्थापन करण्यासाठी सरकारकडून परवानगी मिळाली आहे. या नवीन उपकंपनीचे नाव ग्लोबल कंटेनर प्रायव्हेट लिमिटेड असे असेल. या कंपनीचे काम कंटेनर तयार करणे आणि त्याच्याशी संबंधित कामे करणे असे असेल.

या मल्टिबेगस स्टॉकमध्ये आज अप्पर सर्किट लागले असले तरी, गेले एक वर्ष मात्र गुंतवणूकदारांसाठी चांगले राहिलेले नाही. गेल्या एका वर्षात या शेअरच्या किंमती 26 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. गेल्या एका महिन्यातही या स्टॉकमध्ये 11 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. 

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

टॅग्स :गुंतवणूकव्यवसाय