Join us  

शेअर बाजारात तेजी; सेंसेक्स 194 तर निफ्टी 31 अंकांच्या वाढीसह बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 4:56 PM

Stock Market: अदानी ग्रुपच्या सात कंपन्यांना आजच्या तेजीचा चांगला फायदा झाला.

Closing Bell Today Stock Market Highlights: शेअर बाजारात गुरुवारी(दि.29) जबरदस्त वाढ दिसून आली. निर्देशांक दिवसातील सर्वोच्च पातळीवर बंद झाले. सेन्सेक्स 195 अंकांनी वाढून 72,500 वर पोहोचला, तर निफ्टी 31 अंकांच्या वाढीसह 21,982 वर बंद झाले. बाजारात सर्वाधिक खरेदी मेटल आणि बँकिंग शेअर्समध्ये झाली, तर आयटी आणि हेल्थकेअरमध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. 

निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांक, निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये वाढ नोंदवली गेली. ही तेजी अदानी एंटरप्रायझेस, टाटा कंझ्युमर, इंडसइंड बँक, अदानी पोर्ट्स, ब्रिटानिया, महिंद्रा अँड महिंद्रा आणि पॉवर ग्रिडमध्ये दिसून आली. तर अपोलो हॉस्पिटल, बजाज ऑटो, आयशर मोटर्स, एलटीआय माइंडट्री, यूपीएलचे, Divi's Lab आणि HUL  शेअर्स घसरले. 

शेअर बाजारातील तेजीमुळे गौतम अदानी समूहाच्या 10 पैकी सात सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर हिरव्या मार्कवर बंद झाले, तर तीन कंपन्यांचे शेअर घसरले. तसेच, पटेल इंजिनीअरिंग लि., टाटा टेक्नॉलॉजी, पंजाब अँड सिंध बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स, एशियन पेंट्स लि., टाटा स्टील, ओम इन्फ्रा, एचडीएफसी लाइफ, लार्सन अँड टुब्रोसह अनेकांनी दमदार परतावा दिला. 

(टीप-शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक