Stock Market Closing: शेअर बाजारात आज(दि.19) चढ-उतार पाहायला मिळाला. जागतिक बाजारातील संमिश्र संकेत आणि अमेरिका-इराणमधील संघर्षविरामाच्या शक्यतेमुळे बाजारात किरकोळ वाढीचा अंदाज होता. मात्र, संमिश्र सुरुवातीनंतर आयटी शेअर्सच्या जोरावर बाजाराने दुपारपर्यंत चांगली झेप घेतली. पण दुर्दैवाने, नफावसुलीमुळे ही तेजी टिकू शकली नाही आणि सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरणीसह बंद झाला.
दिवसभराच्या ट्रेडिंगनंतर, बीएसई सेन्सेक्स ११४ अंकांच्या घसरणीसह ७५,२००.८५ वर बंद झाला. तर एनएसई निफ्टी ३१.९५ अंकांनी (०.१४%) घसरून २३,६१८ वर स्थिरावला.
अशी झाली बाजाराची सुरुवात
सकाळी गिफ्ट निफ्टीने बाजार किरकोळ वाढीसह उघडण्याचे संकेत दिले होते. मात्र, सकाळी ९:१५ वाजता जेव्हा ट्रेडिंग सुरू झाले, तेव्हा सेन्सेक्स १२६ अंकांच्या वाढीसह ७५,४४१ वर तर निफ्टी २५ अंकांच्या वाढीसह २३,६७५ वर उघडला. सुरुवातीला बाजाराची ही 'मंगलमय' सुरुवात पाहून गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
दुपारच्या सत्रात आयटी शेअर्सचा धमाका
सकाळी १०:४५ ते दुपारी १:४५ च्या दरम्यान बाजारात आयटी (IT) कंपन्यांच्या शेअर्सनी जोरदार आघाडी घेतली. आयटी शेअर्सच्या जोरावर सेन्सेक्सने तब्बल ४१५ अंकांची झेप घेत ७५,७३० ची पातळी गाठली होती, तर निफ्टीने २३,७८२ या दिवसाच्या सर्वोच्च पातळीला (Day's High) स्पर्श केला होता.
या कंपन्या ठरल्या 'टॉप गेनर्स':
इन्फोसिस : सर्वाधिक ४.५२% ची वाढ
टेक महिंद्रा : ४.८१% ची वाढ (किंमत ₹१४९९.२५)
टीसीएस : २.७४% ची तेजी (किंमत ₹२३४६.९०)
एचसीएल टेक : २.४५% ची वाढ (किंमत ₹११७४.८५)
याशिवाय 'इटरनल'च्या शेअर्समध्येही चांगली तेजी पाहायला मिळाली.
नफावसुलीने खेळ बिघडला
दुपारनंतर बाजाराचे चित्र अचानक बदलले. बँकिंग आणि इतर क्षेत्रातील बड्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. कोटक बँक, टायटन, अल्ट्राटेक सिमेंट, भारती एअरटेल आणि सनफार्मा यांसारख्या शेअर्समध्ये घसरण झाल्यामुळे आयटी शेअर्सनी मिळवलेली सर्व आघाडी वाया गेली आणि बाजार शेवटी घसरणीसह बंद झाला.
रुपयाची ऐतिहासिक घसरण
एकीकडे शेअर बाजारात चढ-उतार सुरू असतानाच, दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण थांबण्याचे नाव घेत नाहीये. आज डॉलरच्या तुलनेत रुपया कमालीचा कमकुवत होत ९६.४७ या आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. रुपयाची ही घसरण अर्थव्यवस्थेसाठी चिंतेची बाब मानली जात आहे.
(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)
Web Summary : Stock market closed lower after a volatile day. IT stocks surged midday but profit-booking in banking and other sectors led to a decline. Rupee hits a record low against the dollar.
Web Summary : शेयर बाजार में उतार-चढ़ाव के बाद गिरावट दर्ज की गई। आईटी शेयरों में दोपहर में तेजी आई, लेकिन बैंकिंग और अन्य क्षेत्रों में मुनाफावसूली से गिरावट आई। रुपया डॉलर के मुकाबले रिकॉर्ड निचले स्तर पर।