Join us  

Share Market Opening Bell : शेअर बाजारात तेजी; आयटी बँकिंग इंडेक्स वधारले, फार्मा, एफएमजीसीमध्ये घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 9:48 AM

बुधवारी शेअर बाजारात चांगली गॅप अप ओपनिंग झाली आणि निफ्टीनं 22,092 चा उच्चांक गाठला, तर सेन्सेक्स देखील 72,692 वर उघडला.

Share Market Opening Bell : बुधवारी शेअर बाजारात चांगली गॅप अप ओपनिंग झाली आणि निफ्टीनं 22,092 चा उच्चांक गाठला, तर सेन्सेक्स देखील 72,692 वर उघडला. आजच्या ओपनिंगची खास गोष्ट म्हणजे निफ्टी 22070 च्या इमिजेट रेझिस्टन्स लेव्हलच्या वर उघडला. 

निफ्टी आयटी, निफ्टी बँक सारख्या निर्देशांकांनी बाजाराच्या या वाढीमध्ये महत्त्वाटी भूमिका बजावली, तर निफ्टी फार्मा निर्देशांक आणि एफएमसीजी निर्देशांकात सुरुवातीला विक्रीचा दबाव दिसून आला. कामकाजाच्या सुरुवातीला अदानी पोर्ट आणि रिलायन्समध्ये एका टक्क्याची तेजी दिसून आली. याशिवाय बीपीसीएल, अपोलो हॉस्पिटल, बजाज फायनान्समध्येही तेजी दिसून आली. 

ब्रिटानिया, डॉक्टर रेड्डीज, नेस्ले इंडिया, टाटा कंझ्युमर या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. सुरुवातीच्या व्यवहारात, सेन्सेक्समध्ये 200 अंकांची वाढ झाली होती आणि निफ्टीनेही 88 अंकांची वाढ दर्शवली आणि 22092 ची पातळी गाठली. 

मंगळवारी ट्रेडिंग सत्रात निफ्टीमध्ये विक्री दिसून आली, परंतु दिवसअखेरीस निफ्टीनं 22000 च्या पातळी राखली आणि बुधवारच्या सत्रात निफ्टीमध्ये गॅप अप ओपनिंग झाली. ज्या प्रकारे घसरणीनंतर बायर्स येत आहेत, ते पाहून, जोपर्यंत निफ्टी 21900 च्या वरच्या पातळीवर राहिल, बाजारात बाऊ ऑन डिपचा मोहल राहिल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

टॅग्स :शेअर बाजार