Join us

जानेवारी महिन्यात ५१,००० कोटींची विक्री; परकीय गुंतवणूकदारांनी का फिरवली पाठ? खरं कारण समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 14:52 IST

FIIs Sell off in Market: जानेवारीमध्ये आतापर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून ५१,७४८ कोटी रुपये काढून घेतले आहेत. दरम्यान, आघाडीच्या ब्रोकरेज हाऊसने भविष्यातही ही विक्री सुरू राहील, असा अंदाज वर्तवला आहे.

FIIs Sell off in Market : सप्टेंबर २०२४ मध्ये भारतीय शेअर बाजार ऐतिहासिक उच्चांकावर होता. जगभरातील अर्थव्यवस्था मंदीच्या खाईत असताना ही कामगिरी सर्वोत्तम मानली जात होती. मात्र, ऑक्टोबर महिन्यापासून सुरू झालेली अद्याप थांबायचं नाव घेतना दिसत नाही. निफ्टी ६ महिन्यातील निच्चांकी स्तरावर घसरला. बाजार कोसळण्याचं मुख्य कारण म्हणजे परकीय संस्थागत गुंतवणूकदार सातत्याने विक्री करत आहेत. शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड अजूनही थांबलेला नाही. जानेवारीमध्ये आतापर्यंत परकीय गुंतवणूकदारांनी बाजारातून ५१,७४८ कोटी रुपये काढून घेतले आहेत. पण, एफपीआय सातत्याने का विक्री करत आहेत?  

परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPIs) आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार (DIIs) यांच्यात दीर्घकाळ स्पर्धा राहिल्यास भारतीय अर्थव्यवस्थेचे किरकोळ नुकसान होऊ शकते, असे कोटक संस्थात्मक इक्विटीजचे मत आहे. ब्रोकिंग फर्मच्या म्हणण्यानुसार, एफपीआय अजूनही मोठ्या प्रमाणात बाजारातून पैसा काढून घेऊ शकतात. तर दुसरीकडे देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार एफपीआयला सध्याच्या 'उच्च' मूल्यांकनात बाहेर पडण्याची संधी देऊ शकतात. यामुळे पेमेंट बॅलन्स (BoP), परकीय गंगाजळी आणि तरलतेमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात.

कशी थांबेल विक्री?कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज म्हणाले, "जर DII/किरकोळ गुंतवणूकदारांनी अधिक सावध दृष्टिकोन स्वीकारला, तर शेअर बाजारात घसरण होऊ शकते. परिणामी कमी मूल्यमापनात परकीय गुंतवणूकदार विक्री थांबवू शकतात. विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ऑक्टोबर २०२४ पासून १७.२ अब्ज डॉलर्स किमतीची निव्वळ इक्विटी विकली आहे. दुय्यम बाजारात, त्यांनी २३.५ अब्ज डॉलर्स किमतीची इक्विटी विकली. तर याच कालावधीत, देशांतर्गत संस्थआंनी २८.७ अब्ज डॉलर्स किमतीचे शेअर्स खरेदी केले.

परकीय गुंतवणूकदारांची सातत्याने विक्री म्हणजे GEM आणि भारत-समर्पित निधीमध्ये कोणताही ओघ नाही. भारतीय शेअर बाजारावर त्यांचा विश्वास कमी असल्याचे दिसते. कोटक म्हणाले की कदाचित त्यांना बाजारातील मूल्यांकन महाग वाटत असेल. महामारीपूर्व पातळीच्या तुलनेत आर्थिक क्षेत्र वगळता सर्व क्षेत्रांमध्ये मूल्यांकन जास्त आहे, यात शंका नाही. पण, ही परिस्थिती लवकरच बदलेला असा विश्वास ब्रोकिंग फर्मला वाटतो.

डिस्क्लेमर : यात शेअर मार्केट विषयी माहिती देण्यात आली आहे. हा कुठल्याही प्रकारे गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्या.