Join us  

Share Market : सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार जोरदार आपटला, Sensex मध्ये ७०० अंकांची घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 10:09 AM

शेअर बाजारात बुधवारी झालेल्या भूकंपानंतर आज, गुरुवारीही शेअर बाजार कामकाजाच्या सुरुवातीलाच जोरदार आपटला

Share Market Live today : शेअर बाजारात व्यवहार सुरू होताच मोठी घसरण दिसून आली. शेअर बाजारात बुधवारी झालेल्या भूकंपानंतर आज, गुरुवारीही शेअर बाजार कामकाजाच्या सुरुवातीलाच जोरदार आपटला. BSE सेन्सेक्स आणि NSE निफ्टी मोठ्या घसरणीसह उघडले. एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये आजही घसरत दिसून येत आहे. बँकिंग शेअर्स आणि फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या शेअर्सवर मोठा दबाव आहे. 

शेअर बाजार उघडल्यानंतर काही मिनिटांतच सेन्सेक्स 518 अंकांनी घसरून 70982 च्या पातळीवर गेला. त्याच वेळी, निफ्टीमध्येही मोठी घसरण दिसून आली. वृत्त लिहीपर्यंत सेन्सेक्समध्ये 701 अंकांची घसरण झाली होती. तर निफ्टी 50 मध्ये 240 अंकांची घसरण होऊन तो 21331.80 वर होता. निफ्टी टॉप लूजर्समध्ये, एलटीआय माईंडट्री 9.55 टक्क्यांनी घसरला. पॉवर ग्रीडमध्ये 2.56 टक्क्यांची घसरण दिसून आली. बुधवारी कामकाजाच्या अखेरिस शेअर बाजारात 1600 अंकांपेक्षा अधिक घसरण दिसून आली होती.

HDFC बँकेच्या शेअरमध्ये गुरुवारीही घसरण दिसून आली. कामकाजादरम्यान यात  2.97 टक्क्यांनी घसरत झाली. तर एशियन पेंट्सच्या शेअरमध्ये 2.69 टक्क्यांची, एसबीआय लाइफच्या शेअरमध्ये 2.25 टक्क्यांची घसरण झाली. दुसरीकडे, अदानी पोर्ट्स, अपोलो हॉस्पिटल, टाटा मोटर्स, ओएनजीसी टॉप गेनर्सच्या यादीत आहेत.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजार