Join us

SBI ची जबरदस्त एफडी, २ लाखांच्या गुंतवणूकीवर मिळेल ३२ हजारांचा नफा

By जयदीप दाभोळकर | Updated: April 7, 2025 12:32 IST

SBI FD Scheme: जेव्हा जेव्हा पैसे गुंतवण्याची वेळ येते तेव्हा बहुतेक लोक एफडीचा विचार करतात. लोकांमध्ये बँक एफडी हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहे. याचं कारण म्हणजे एफडीमध्ये मिळणारा परतावा आधीच ठरलेला असतो.

SBI FD Scheme: जेव्हा जेव्हा पैसे गुंतवण्याची वेळ येते तेव्हा बहुतेक लोक एफडीचा विचार करतात. लोकांमध्ये बँक एफडी हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहे. याचं कारण म्हणजे एफडीमध्ये मिळणारा परतावा आधीच ठरलेला असतो. एफडीमध्ये पैसे गमावण्याची भीती नाही. देशातील विविध बँकांकडून ग्राहकांना वेगवेगळ्या व्याजदरानं एफडी ऑफर केली जाते. अशावेळी तुम्ही अशा बँक एफडीमध्ये गुंतवणूक केली पाहिजे जिथे तुम्हाला सर्वाधिक परतावा मिळेल.

आज आम्ही तुम्हाला देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एफडीबद्दल सांगणार आहोत. एसबीआय आपल्या ग्राहकांना एफडीवर खूप चांगल्या व्याजदरानं परतावा देते. अशावेळी तुम्ही एसबीआय एफडीमध्ये गुंतवणूक करून खूप चांगला नफा कमावू शकता. चला जाणून घेऊया.

प्रकाश झोतापासून दूर, पडद्यामागून घेतात मोठे निर्णय; जाणून घ्या कोण आहेत गौतम अदानींचे बंधू महासुख अदानी?

एसबीआय एफडी योजना

एसबीआयमध्ये तुम्ही ७ दिवस ते १० वर्षांच्या कालावधीच्या एफडीमध्ये गुंतवणूक करू शकता. एसबीआय सामान्य नागरिकांना ३.५० टक्के ते ७ टक्के व्याजदरानं परतावा देते. तर एसबीआय ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर ४ टक्के ते ७.५० टक्क्यांपर्यंत व्याज दरानं परतावा देते.

३२,००० रुपयांपर्यंत नफा

जर तुम्ही एसबीआयच्या एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही एसबीआयच्या एफडीमध्ये २ वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता. एसबीआयच्या या एफडीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना ७ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.५० टक्के व्याजदर मिळतो. जर तुम्ही या योजनेत २ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण २,२९,७७६ रुपये मिळतील. ज्येष्ठ नागरिकांना एकूण २ लाख ३२ हजार ४४ रुपये मिळणार आहेत.

टॅग्स :स्टेट बँक आॅफ इंडियागुंतवणूकपैसा