Join us  

Opening Bell: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; SBI लाईफमध्ये तेजी, Axis बँक घसरला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2024 9:49 AM

शेअर बाजाराचे कामकाज शुक्रवारी घसरणीसह सुरू झालं. कामकाजाच्या सुरुवातीला बीएसई सेन्सेक्स 108 अंकांनी घसरला आणि 74120 अंकांच्या पातळीवर उघडला.

Stock Market Open: शेअर बाजाराचे कामकाज शुक्रवारी घसरणीसह सुरू झालं. कामकाजाच्या सुरुवातीला बीएसई सेन्सेक्स 108 अंकांनी घसरला आणि 74120 अंकांच्या पातळीवर उघडला. तर निफ्टी 40 अंकांच्या घसरणीसह 22475 अंकांच्या पातळीवर उघडला. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात, निफ्टी मिड कॅप 100 आणि बीएसई स्मॉल कॅपमध्ये किंचित वाढ दिसून येत होती तर, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत होते. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास पतधोरण समितीच्या बैठकीनंतर काय निर्णय सांगतील याकडे बाजाराचं लक्ष असणार असल्याची प्रतिक्रिया तज्ज्ञांनी दिली. 

शेअर बाजाराच्या सुरुवातीला ज्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली त्या शेअर्सबद्दल बोलायचं झालं तर त्यात नेस्ले इंडिया, एसबीआय लाइफ, एनटीपीसी, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक आणि टाटा कंझ्युमर यांचा समावेश होत. तर बीपीसीएल जेएसडब्ल्यू स्टील, हिंदाल्को, ॲक्सिस बँक, लार्सन अँड टुब्रो, टेक महिंद्रा आणि बजाज फायनान्स या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.  

निफ्टी आयटी, निफ्टी बँक, निफ्टी ऑटो आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्समध्ये घसरण दिसून आली, तर निफ्टी फार्मा आणि निफ्टी एफएमसीजी निर्देशांक किंचित वाढीसह कार्यरत होते. प्री-ओपन ट्रेडिंगमध्ये, बीएसई सेन्सेक्स 60 अंकांनी वधारला होता आणि 74,287 अंकांच्या पातळीवर काम करत होता, तर निफ्टी 28 अंकांनी घसरला घसरून 22486 अंकांच्या पातळीवर कामकाज करत होता. गिफ्ट निफ्टी देशांतर्गत शेअर बाजाराच्या कामकाजाची सुरुवात घसरणीसह होऊ शकते असे संकेत देत होता.

टॅग्स :शेअर बाजार