Join us  

Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घसरला; नेस्लेमध्ये तेजी, टीसीएसमध्ये घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 9:44 AM

शेअर बाजारातील कामकाज मंगळवारी घसरणीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 493 अंकांनी घसरला आणि 72906 अंकांच्या पातळीवर उघडला.

शेअर बाजारातील कामकाज मंगळवारी घसरणीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 493 अंकांनी घसरला आणि 72906 अंकांच्या पातळीवर उघडला. तर निफ्टी 137 अंकांच्या घसरणीसह 22135 अंकांच्या पातळीवर उघडला. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात निफ्टीचे सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत होते. 

जर आपण शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात वाढ झालेल्या शेअर्सबद्दल बोललो, तर यामध्ये नेस्ले इंडिया, भारती एअरटेल, टायटन, सिप्ला, आयशर मोटर्स, डॉ. रेड्डीज आणि डिविज लॅबच्या शेअर्सचा समावेश होता. तर टॉप लूझर्समध्ये एलटीआय माईंडट्री, टीसीएस, इन्फोसिस, टीसीएस, कोटक बँक, बजाज फायनान्स, एनटीपीसी  आणि इंडसइंड बँकेच्या शेअर्सचा समावेश होता. 

प्री ओपनमध्ये मार्केटची स्थिती 

मंगळवारी, प्री-ओपन ट्रेडमध्ये, बीएसई सेन्सेक्स 507 अंकांनी घसरला आणि 72892 अंकांच्या पातळीवर कामकाज करत होता, तर निफ्टी 147 अंकांच्या घसरणीसह 22,125 अंकांच्या पातळीवर कार्यरत होता. शेअर बाजाराचं कामकाज घसरणीसह सुरू होऊ शकतं असे संकेत गिफ्ट निफ्टीकडून मिळत होते. सुरुवातीला आशियाई शेअर बाजारांच्या कामकाजात घसरण दिसून आली. 

मल्टिबॅगर शेअरची स्थिती 

सोमवारी शेअर बाजारात मोठी घसरण नोंदवण्यात आली आणि मंगळवारी पुन्हा एकदा शेअर बाजाराचे कामकाज घसरणीसह सुरू झालं. शेअर बाजाराचे कामकाज सुरू झाल्यानंतर काही वेळातच निफ्टी ऑटो आणि बीएसई स्मॉल कॅप निर्देशांकात किंचित वाढ नोंदवली गेली. गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांबद्दल बोलायचं तर, मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात ओएनजीसीचे शेअर्स तेजीत होते, तर भारत इलेक्ट्रॉनिक्स, लार्सन अँड टुब्रो, एशियन पेंट्स, विप्रो, एचडीएफसी, एचसीएल टेक, टीसीएस, कोटक महिंद्रा बँक आणि इन्फोसिस लिमिटेडच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

टॅग्स :शेअर बाजार