Join us  

Opening Bell : निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये झालं गॅप डाऊन ओपनिंग; HDFC लाईफ, अदानी पोर्ट्स वधारला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 9:45 AM

मोठ्या वीकेंडनंतर मंगळवारी शेअर बाजारातील व्यवहाराची घसरणीसह सुरुवात झाली.

Opening Bell : मोठ्या वीकेंडनंतर मंगळवारी शेअर बाजारातील व्यवहाराची घसरणीसह सुरुवात झाली आणि निफ्टी 148 अंकांच्या घसरणीसह उघडला. तर सेन्सेक्स 435 अंकांनी घसरला. मात्र, बाजार उघडताच रिकव्हरी झाली आणि निफ्टीने पुन्हा एकदा 22000 च्या पातळीवर व्यवहार सुरू केला. 

सकाळी 9.30 वाजता निफ्टी 27 अंकांनी घसरून 22069 स्तरावर तर सेन्सेक्स 165 अंकांनी घसरून 72638 पातळीवर व्यवहार करत होता. गेल्या शेअर बाजार पॉझिटिव्ह नोटवर बंद झाला. परंतु पॉझिटिव्ह नोटनंतर गॅप डाउन ओपनिंगमुळे आज बाजारातील अस्थिरता वाढू शकते. 

शुक्रवारच्या ट्रेडिंग सत्रानंतर आयटी शेअर्सवर आज पुन्हा विक्रीचा दबाव आहे. इन्फोसिस आणि टीसीएस घसरणीसह उघडले, तर आयटी पॅकमध्ये, एचसीएल आणि विप्रोची सकारात्मक सुरुवात झाली. एचडीएफसी लाइफ, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फायनान्स, अदानी पोर्ट, अपोलो हॉस्पिटल, इंडसइंड बँक यांचे शेअर्स वाढीसह उघडले. तर बीपीएसीएल, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल सारख्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक