Join us  

LIC नाही, आता 'हा' असेल देशातील सर्वात मोठा IPO! टाटा समूहाने केली मोठी तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 2:14 PM

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नियमांमध्ये बदल केले आहेत.यामुळे मध्यवर्ती बँकेने टाटा सन्सला NBFC श्रेणीत टाकले आहे .

भारतीय मार्केटमध्ये आतापर्यंत सर्वात मोठी आयपीओ विमा कंपनी LIC चा होता. पण, आता एलआयसीला मागे टाकत आणखी भारतीय कंपनी सर्वात मोठा आयपीओ आणणार आहे. देशातील सर्वात मोठा टाटा समूह तब्बल १९ वर्षांनंतर IPO मार्केटमध्ये दमदार एंट्री करण्याच्या तयारीत आहे आणि सर्वात मोठा IPO लॉन्च करून एक नवा विक्रम रचू शकतो. टाटाचा शेवटचा IPO 2004 मध्ये आला होता. टाटा समूहाच्या अनेक कंपन्यांचे शेअर्स शेअर बाजारात लिस्टेड असले तरी टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडपासून टाटा मोटर्सपर्यंतच्या नावांचा समावेश आहे. 

होऊ दे खर्च! खरेदीला आलंय उधाण; ऑनलाइन खरेदीत भरघोस वाढ

या अगोदर टाटा कंपनीचा आयपीओ २००४ साली आला होता, जेव्हा IT कंपनी TCS ने बाजारात प्रवेश केला होता. यानंतर, आता प्रारंभिक लोकार्पण सादर करण्याची तयारी समूहाकडून करण्यात आली आहे. टाटा टेक व्यतिरिक्त, टाटा सन्सचा आयपीओ, आतापर्यंत सुरू असलेल्या चर्चेनुसार, टाटा समूहाची कंपनी टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ येणार आहे. सेबीने टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ लॉन्च करण्यासही मान्यता दिली आहे. दरम्यान, अलीकडील नियामक बदलामुळे टाटा समूहाच्या आणखी एका आयपीओचा मार्ग खुला झाला आहे.

आता समूह आपली होल्डिंग कंपनी टाटा सन्सचा IPO लॉन्च करू शकतो. रिझव्‍‌र्ह बँकेने नुकत्याच केलेल्या नियमांमध्ये केलेल्या बदलांमुळे, मध्यवर्ती बँकेने टाटा सन्सला वरच्या स्तरावरील NBFC श्रेणीत टाकले आहे. यामुळे आता टाटा सन्स नवा आयपीओ आणू शकतो.

सप्टेंबर २०२५ पर्यंत लॉन्च करण्याची तयारी असल्याचा अंदाज आहे. अहवालानुसार, या अंतर्गत टाटा सन्सला सप्टेंबर २०२५ पर्यंत स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड होण्यासारखे पर्याय पहावे लागतील. एका १४ सप्टेंबर २०२३ रोजी RBI ने 15 NBFC ची यादी जारी केली, यामध्ये टाटा सन्सचे नाव वरच्या श्रेणीत आहे. हे टाळण्यासाठी, सर्वात सोपा पर्याय म्हणजे कंपनीला बाजारात लिस्टेड करणे आणि यासाठी टाटा सन्सला त्याचा आयपीओ लॉन्च करणे आवश्यक आहे, असं या अहवालात म्हटले आहे. 

एलआयसीने २१,००० कोटी रुपयांचा IPO लॉन्च केला

टाटा सन्सचे मूल्यांकन सध्या अंदाजे ११ लाख कोटी रुपये आहे. आता IPO लाँच केल्याने, कंपनीला टाटा ट्रस्ट आणि इतर भागधारकांसह सुमारे ५ टक्के हिस्सा कमी करावा लागेल आणि या आधारावर, टाटा सन्सच्या IPO च्या इश्यूचा आकार सुमारे ५५,००० कोटी रुपये असू शकतो. हा आकडा टाटा समूहाचा आयपीओ देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ बनवेल. याआधी भारतीय आयुर्विमा महामंडळाने २१,००० कोटी रुपयांचा IPO लॉन्च केला होता, जो आतापर्यंतचा एक विक्रम आहे.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची  गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :टाटाशेअर बाजारएलआयसी आयपीओ