Join us

मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 11:30 IST

Mukesh Ambani Reliance Retail: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील ही कंपनी आयपीओ लाँच करण्याच्या तयारीत आहे. गेल्या वर्षभरापासून या कंपनीच्या आयपीओची चर्चा सुरू आहे.

Mukesh Ambani Reliance Retail: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील कंपनी रिलायन्स रिटेलचा आयपीओ लाँच करण्याच्या तयारीत आहे. गेल्या वर्षभरापासून या कंपनीच्या आयपीओची चर्चा सुरू आहे. रिलायन्सनं ही आपली उपकंपनी लिस्ट करणार असल्याचं स्पष्ट केलंय. मात्र, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडकडून अद्याप कोणतीही कालमर्यादा जाहीर करण्यात आलेली नाही. दरम्यान, रिलायन्स रिटेलनं नफ्यासाठी आपली रणनीती बदलली आहे.

काय आहे रिलायन्स रिटेलची नवी रणनीती?

इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, रिलायन्स रिटेलनं सर्व नवीन स्टोअर्सना नफा कमावण्यासाठी ६ ते १२ महिन्यांची मुदत दिली आहे. रिलायन्स रिटेलची स्टोअर्स या काळात नफा कमावू शकली नाहीत तर ती बंद होतील. यापूर्वी रिलायन्स रिटेलच्या नव्या स्टोअर्सना नफा कमावण्यासाठी २ वर्षांचा कालावधी मिळत होता. या कंपनीच्या बदललेल्या रणनीतीचं कारणही आयपीओ आहे.

IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 

आर्थिकदृष्ट्या किती मजबूत?

जानेवारी ते मार्च २०२५ या तिमाहीत रिलायन्स रिटेलचा निव्वळ नफा ३,५४५ कोटी रुपये होता. वार्षिक आधारावर कंपनीच्या निव्वळ नफ्यात २९.१० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर चौथ्या तिमाहीत कंपनीचा महसूल ८८,६२० कोटी रुपये होता. ज्यात वार्षिक आधारावर १५.६५ टक्के वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये रिलायन्स रिटेलचा नफा ११.३३ टक्क्यांनी वाढून १२,३८८ कोटी रुपये झाला आहे. तर या काळात कंपनीचा महसूल ३,३०,८७० कोटी रुपये झाला. 

रिलायन्स रिटेलच्या महसुलात आर्थिक वर्ष २०२४ च्या तुलनेत गेल्या आर्थिक वर्षात ७.८५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत एकूण उत्पन्न ७६,६२७ कोटी रुपये आणि रिलायन्स रिटेलचा करोत्तर नफा २७४६ कोटी रुपये होता.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :मुकेश अंबानीइनिशिअल पब्लिक ऑफरिंग