Join us  

या कंपनीला सरकारकडून मिळाली खुशखबर, शेअर खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड; ₹395 वर पोहोचला भाव!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 5:56 PM

गेल्या एका वर्षात या शेअरने 270 टक्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. तर गेल्या तीन वर्षांत 1,150 टक्क्यांचा आश्चर्यचकित करणारा परतावा दिला आहे. 

लोकेश मशिन्सचा शेअर आज गुरुवारी 11 टक्क्यांनी वधारला आहे. यानंतर कंपनीचा शेअर 395 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला आहे. महत्वाचे म्हणजे, गृह मंत्रालयाकडून कंपनीला शस्त्र परवाना मिळाल्याने कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी आली आहे. यासंदर्भात लोकेश मशीन्सने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून त्यांना छोट्या शस्त्रांचे उत्पादन आणि इन-हाऊस प्रूफ ट्रेनिंगसाठी फॉर्म VII मध्ये शस्त्र परवाना मिळाले आहे.

काय म्हटले आहे कंपनीने? -कंपनीने म्हटले आहे, 'कमर्शियल परवाना मिळाल्याने, आमच्या सध्याच्या प्रोडक्ट पोर्टफोलिओचा विस्तार होईल. आम्हाला विविध कॅलिबरच्या पिस्तूल, असॉल्ट रायफल्स आणि रायफल्स तरयार करता येतील आणि आमच्या इन-हाऊस सुविधेत छोट्या शस्त्रांचे प्रूफ टेस्टिंग देखील होईल.' हा परवाना मिळाल्यानंतर, स्मॉलकॅप स्टॉक लोकेश मशीन्समध्ये तेजी आली आहे आणि हिचे मार्केट कॅप ₹710 कोटींपेक्षाही वर पोहोचले आहे.

270% ने वधारला शेअर - लोकेश मशीन्सच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. गेल्या एका वर्षात या शेअरने 270 टक्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. तर गेल्या तीन वर्षांत 1,150 टक्क्यांचा आश्चर्यचकित करणारा परतावा दिला आहे. 

एका आठवड्यात या शेअरमध्ये 27% हून अधिकची तेजी आली आहे. लोकेश मशीन्स कंपनी ही देशातील टॉप मशीन टूल निर्मात्यांपैकी एक आहे. कंपनीनुसार, कंपनीच्या जवळफास 20 टक्के मशिन्स ऑटो ओईएमला, 60 टक्के पुरवठा ऑटो सहायक कंपन्यांना आणि 20% पुरवठा सामान्य उद्योगांना आणि निर्यात करणाऱ्यांना केला जातो.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) 

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकशेअर बाजार