Join us

LIC नं टाटाच्या ३ शेअर्समधील हिस्सा विकला, घसरणीचा परिणाम; तुमच्याकडे आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 13:34 IST

LIC Portfolio Stocks: एनएसईमध्ये लिस्टेड कंपन्यांमधील एलआयसीचा हिस्सा ३.५१ टक्क्यांपर्यंत घसरलाय. पाहा कोणत्या स्टॉक्समधील हिस्सा केला कमी आणि कशातील हिस्सा वाढवला.

LIC Portfolio Stocks: चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या तिसऱ्या तिमाहीत भारतातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार (DII), भारतीय आयुर्विमा महामंडळानं (LIC) उच्च मूल्यांकन आणि कमाईतील मंदीच्या पार्श्वभूमीवर प्रॉफिट बुकिंग केल्यामुळे ९८ शेअर्समधील हिस्सा कमी केलाय. त्यामुळे एनएसईमध्ये लिस्टेड कंपन्यांमधील एलआयसीचा हिस्सा ३.५१ टक्क्यांपर्यंत घसरलाय.

यातील हिस्सा विकला

एलआयसीने तिसऱ्या तिमाहीत टाटा पॉवर, टाटा केमिकल्स आणि व्होल्टास सारख्या टाटा समूहातील काही शेअर्समधील हिस्सा विकला होता. टाटा पॉवरमध्ये कंपनीने १५४ बीपीएस हिस्सा विकून तिसऱ्या तिमाहीत आपला हिस्सा ३.१३ टक्क्यांवर आणला, जो दुसऱ्या तिमाहीत ४.६७ टक्के होता. व्होल्टासमधील एलआयसीचा हिस्सा ११३ बीपीएसनं घसरून २.०३ टक्के झाला, तर टाटा केमिकल्समध्ये तो ९६ बीपीएसनं घसरून ७.२५ टक्क्यांवर आला. एलआयसीची पोर्टफोलिओ व्हॅल्यू सप्टेंबर तिमाहीतील १६.७५ लाख कोटी रुपयांवरून तिसऱ्या तिमाहीत ८.८० टक्क्यांनी घसरून १५.२८ लाख कोटी रुपयांवर आली आहे. मात्र, या तिमाहीत एलआयसीने ७१ शेअर्समध्ये मालकी वाढवली.

'या' शेअर्समधील हिस्सा वाढला

दरम्यान, प्रॉक्टर अँड गॅम्बल हायजीन, पतंजली फूड्स, नेस्ले इंडिया आणि डाबर सारख्या एफएमसीजी कंपन्यांमध्ये तिसऱ्या तिमाहीत एलआयसीनं खरेदी केली. कोचीन शिपयार्ड आणि अॅस्ट्रल सारख्या शेअर्समध्ये एलआयसीचा हिस्सा तिसऱ्या तिमाहीतील १% वरून अनुक्रमे २.४% आणि २.३१% पर्यंत वाढला.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :एलआयसीगुंतवणूकसरकार