Join us
Daily Top 2Weekly Top 5

पडत्या बाजारात LIC ने खेळला मोठा डाव; 'या' कंपन्यांमध्ये केली तब्बल ₹१८,५०० कोटींची गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 15:51 IST

LIC Investment: LIC ची ही रणनीती गुंतवणूकदारांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे.

LIC Investment: भारतीय शेअर बाजारात मार्च तिमाहीदरम्यान मोठी घसरण सुरू आहे. मात्र, Life Insurance Corporation of India (LIC) ने बाजारातील या घसरणीला दीर्घकालीन संधी मानत, विविध कंपन्यांमध्ये तब्बल ₹१८,५०० कोटींची गुंतवणूक केली आहे. 

विशेष म्हणजे, LIC ने अशा कंपन्यांवर मोठा दाव लावला, ज्यांचे शेअर्स तिमाहीदरम्यान २०% ते ३०% पर्यंत घसरले होते. त्यामुळे LIC ची ही रणनीती बाजारातील “Buy the Dip”, म्हणजेच घसरणीत खरेदी करण्याचे मोठे उदाहरण मानली जात आहे.

Bajaj Finance मध्ये सर्वाधिक गुंतवणूक

LIC ने मार्च तिमाहीत सर्वाधिक खरेदी Bajaj Finance मध्ये केली. कंपनीने अतिरिक्त २.३२ कोटी शेअर्स खरेदी करत सुमारे ₹२,१६७ कोटींची गुंतवणूक केली. विशेष म्हणजे, या काळात Bajaj Finance चा शेअर जवळपास १९% घसरला होता. तरीही LIC ने या घसरणीला दीर्घकालीन गुंतवणुकीची संधी मानले.

Bharti Airtel, TCS आणि Cipla मध्येही मोठी खरेदी

LIC ने Bharti Airtel मध्ये ₹२,१५३ कोटी, Tata Consultancy Services (TCS) मध्ये ₹२,१४३ कोटी आणि Cipla मध्ये ₹२,०६८ कोटींची गुंतवणूक केली. या गुंतवणुकीतून LIC ने दूरसंचार, IT आणि फार्मा क्षेत्रांवर दीर्घकालीन विश्वास दाखवला आहे.

IRFC मधील हिस्सेदारी वाढल्याने चर्चा

सर्वाधिक चर्चेत राहिलेली गुंतवणूक म्हणजे Indian Railway Finance Corporation (IRFC) मधील हिस्सेदारी वाढ. LIC ने IRFC चे अतिरिक्त १८.७२ कोटी शेअर्स खरेदी केले, ज्यांची अंदाजे किंमत ₹२,०४४ कोटी होती. तिमाहीदरम्यान IRFC चा शेअर जवळपास ३०% घसरला होता. तरीही LIC ने या PSU कंपनीतील आपली हिस्सेदारी १.१०% वरून थेट २.५४% पर्यंत वाढवली.

IT क्षेत्रावरही LIC चा मोठा विश्वास

IT क्षेत्रातही LIC ने मोठी गुंतवणूक केली. Infosys मध्ये सुमारे ₹१,८९७ कोटी आणि Hindustan Aeronautics Limited (HAL) मध्ये ₹१,८१९ कोटी गुंतवण्यात आले. या कालावधीत Infosys चा शेअर २३% आणि HAL चा शेअर सुमारे २१% घसरला होता. याशिवाय HCL Technologies, Hyundai Motor India आणि Maruti Suzuki हे शेअर्सही LIC च्या मोठ्या खरेदी यादीत होते.

काही बँकिंग आणि मेटल शेअर्समध्ये नफावसुली

LIC ची रणनीती केवळ खरेदीपुरती मर्यादित नव्हती. कंपनीने काही बँकिंग आणि मेटल शेअर्समध्ये नफावसुलीही केली. सर्वात मोठी विक्री State Bank of India (SBI) मध्ये झाली, जिथे LIC ने ₹४,६२६ कोटींचे शेअर्स विकले. तसेच ICICI Bank आणि HDFC Bank मधील हिस्सेदारीही कमी करण्यात आली. विशेष म्हणजे, HDFC Bank च्या शेअरमध्येही मोठी घसरण झाली होती. मात्र, LIC ने येथे खरेदी वाढवण्याऐवजी नफावसुलीचा मार्ग निवडला.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : LIC Invests ₹18,500 Crore in Dip, Bets Big on Key Stocks

Web Summary : Taking advantage of market dips, LIC invested ₹18,500 crore in Q1, focusing on companies like Bajaj Finance, Bharti Airtel, and TCS. While increasing stakes in some sectors, it booked profits in banking and metal stocks, showcasing a strategic investment approach.
टॅग्स :एलआयसीगुंतवणूक