IPO News: आयपीओच्या बाबतीत पुढील आठवडा गुंतवणूकदारांसाठी अनेक संधी घेऊन येणार आहे. इंडो फार्म इक्विपमेंटच्या नावाचाही यात समावेश आहे. पुढील आठवड्यात युनिमेक एअरोस्पेस अँड मॅन्युफॅक्चरिंगचं लिस्टिंग आहे. म्हणजेच पुढील आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष प्रायमरी मार्केटवर असणार आहे.
पुढील आठवड्यात या कंपन्यांच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे.
इंडो फार्म इक्विपमेंट आयपीओ (Indo Farm Equipment IPO)
इंडो इक्विपमेंटचा आयपीओ ३१ डिसेंबरला खुला होणार आहे. कंपनीचा आयपीओ २ जानेवारी २०२५ पर्यंत गुंतवणूकदारांसाठी खुला राहणार आहे. आयपीओसाठी कंपनीने प्रति शेअर २०४ ते २१५ रुपये प्राइस बँड निश्चित केला आहे. कंपनीनं एकूण ६९ शेअर्सचा एक लॉट केला होता. ज्यामुळे गुंतवणूकदारांना किमान १४८३५ रुपये गुंतवणूक करावी लागणारे. ग्रे मार्केटमध्ये कंपनीचा आयपीओ ८५ रुपयांच्या प्रीमियमवर आहे.
आन्या पॉलिटेक एनएसई एसएमई (Anya Polytech NSE SME)
आयपीओसाठी प्राइस बँड १३ ते १४ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. कंपनीने एकूण १००० शेअर्सचा एक लॉट तयार केलाय. ज्यामुळे गुंतवणूकदारांना १,४०,००० रुपयांची बोली लावावी लागणार आहे. आयपीओची साईज ४४.८० कोटी रुपये आहे. हा आयपीओ ३० डिसेंबरला बंद होणार आहे.
सिटीकेम इंडियाचा आयपीओ (Citichem India IPO)
कंपनीच्या आयपीओची साईज १२.६० कोटी रुपये आहे. हा इश्यू पूर्णपणे फ्रेश शेअर्सवर आधारित आहे. कंपनीचा आयपीओ २७ डिसेंबर रोजी खुला झाला होता. गुंतवणूकदारांना ३१ डिसेंबरपर्यंत आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळेल. याचा प्राईज बँड ७० रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आलाय.
टेक्निकम ऑर्गेनिक्स आयपीओ (Technichem Organics IPO)
हा आयपीओ ३१ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत खुला राहणार आहे. या ऑफरचा प्राइस बँड ५२ ते ५५ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. या आयपीओसाठी २००० शेअर्सचा एक लॉट तयार करण्यात आलाय. ज्यामुळे गुंतवणूकदारांना किमान १,१०,००० रुपयांची गुंतवणूक करावी लागणारे.
लिओ ड्राय फ्रूट्स अँड स्पाइस आयपीओ (Leo Dry Fruits and Spices IPO)
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला हा आयपीओ सुरू होणार आहे. कंपनीचा आयपीओ १ जानेवारी ते ३ जानेवारी या कालावधीत खुला राहणार आहे. आयपीओसाठी प्राइस बँड ५१ ते ५२ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आलाय. आयपीओची साईज २५.१२ कोटी रुपये आहे.
फॅबटेक टेक्नॉलॉजीज आयपीओ (Fabtech Technologies IPO)
हा आयपीओ ३ जानेवारी रोजी गुंतवणूकदारांसाठी खुला होणार आहे. कंपनीच्या आयपीओचा प्राईज बँड अद्याप निश्चित करण्यात आलेला नाही. हा आयपीओ ७ जानेवारी पर्यंत खुला राहणार आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलीये. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)