Join us  

कंगाल केल्यानंतर पुन्हा मालामाल करतायत हे 2 शेअर, किंमत 10 रुपयांपेक्षा कमी!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2023 3:30 PM

या दोन्ही शेअर्समध्ये चांगली तेजी दिसून येत आहे...

शेअर बाजारात आज जय प्रकाश पॉवर (JP Power) आणि जयप्रकाश असोसिएट्सच्या (JP Associates) गुंतवणूकदारांना चांगले दिवस येताना दिसत आहेत. या दोन्ही शेअर्समध्ये चांगली तेजी दिसून येत आहे. दुपारी 1.30 वाजता जेपी असोसिएट्सचा शअर 11.37 टक्क्यांच्या तेजीसह 8.17 रुपयांवर ट्रेड करत होता, तर जेपी पॉवरचा शेअर 7.56 टक्क्यांच्या तेजीसह 6.40 रुपयांवर ट्रेड करताना दिसत आहे.

जेपी असोसिएट्सच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी (Jaiprakash Associates Limited) -बीएसईवर कंपनीचा शेअर 7.33 रुपयांवर ओपन झाला होता. यानंतर तो 13 टक्क्यांच्या उसळीसह 8.25 रुपयांवर पोहोचला होता. 12 डिसेंबर 2022 रोजी बीएसईवर कंपनीच्या शेअरची किंमत 11.74 रुपये होती. तेव्हापासून आतापर्यंत कंपनीच्या  शेअरची किंमत 30 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. कंपनीचा 52 आठवड्यांतील उच्चांक 12.50 रुपये आहे.

जेपी पॉवरही आज करतोय मालामाल (Jaiprakash Power Ventures Limited) -एनएसईमध्ये जयप्रकाश पॉवरचा शेअर आज 6 रुपयांवर खुला झाला. यानंतर तो 8 टक्क्यांच्या तेजीसह 6.50 रुपयांवर पोहोचला. 20 डिसेंबर 2022 पासून आतापर्यं हा स्टॉक 23 टक्क्यांनी घसरला आहे. महत्वाचे म्हणजे, कंपनीचा 52 आठवड्यांतील उच्चांक 9.45 रुपेये एवढा आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

 

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकशेअर बाजार