Jio BlackRock Mutual Fund: जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडानं गुंतवणूकदारांसाठी तीन म्युच्युअल फंड स्कीम्स लाँच केल्यात. कंपनीनं तीन ओपन-एंडेड डेट स्कीम सुरू केल्या आहेत. जिओब्लॅकरॉक लिक्विड फंड, जिओब्लॅकरॉक मनी मार्केट फंड आणि जिओब्लॅकरॉक ओव्हरनाईट फंड असं यांचं नाव आहे. या तीन फंडांसाठी न्यू फंड ऑफर (NFO) सोमवार, ३० जूनपासून सुरू झाली आहे आणि ती २ जुलैपर्यंत चालेल.
JioBlackRock Liquid Fund मधील पैसे डेट आणि मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्समध्ये गुंतवले जातील ज्यांची मुदत ९१ दिवसांपेक्षा कमी आहे. ही एक ओपन-एंडेड लिक्विड स्कीम आहे, म्हणजे तुम्ही जेव्हाही गुंतवणूक करू शकता आणि केव्हाही पैसे काढू शकता (लिक्विडीटी राखली जाते). जिओब्लॅकरॉक लिक्विड फंड विशेषतः ज्यांच्याकडे काही अतिरिक्त पैसे आहेत आणि थोड्या काळासाठी सुरक्षित आणि हुशारीनं कुठेतरी गुंतवू इच्छितात, अशा गुंतवणूकदारांसाठी हा फंड आहे.
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
किमान गुंतवणूक किती?
जर तुम्हाला एकरकमी गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही किमान ₹५०० पासून सुरुवात करू शकता. SIP (दरमहा थोडीशी रक्कम गुंतवणं) देखील ₹५०० पासून सुरुवात करू शकता. स्विच-इनसाठी (दुसऱ्या फंडातून पैसे आणून या फंडात गुंतवणूक करण्यासाठी) ₹५०० देखील आवश्यक आहेत. ही स्कीम लो टू मॉडरेट रिस्क श्रेणीत येते. म्हणजेच, जास्त जोखीम नाही, परंतु तरीही काही चढउतार असू शकतात.
शेअरमध्ये तेजी
जिओ फायनान्शियलच्या शेअरच्या किंमतीत आजही तेजी दिसून येत आहे. सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये वाढ झाली आणि या ५ दिवसांत यात १३% ची वाढ झाली. कंपनीच्या विविध व्यवसायांना सतत मंजुरी मिळत असल्यानं ही वाढ झाली आहे, ज्यामुळे जिओ फायनान्शियल आता गुंतवणूकदारांना संपूर्ण गुंतवणूक व्यासपीठ प्रदान करू शकेल. सोमवारी कामकाजादरम्यान कंपनीच्या शेअरमध्ये अडीच टक्क्यांपर्यंतची तेजी दिसून आली.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)